क्रिकेट सामन्या दरम्यान प्रेक्षकांनी घातलेला गोंधळ आपण अनेकदा पाहतो. अनेकदा चाहते खेळ सुरू असचाना एखाद्या खेळाडूला भेटण्याच्या आशेने मैदानात येऊन खेळात व्यत्यय आणत असल्याचेही अनेकदा दिसून येते. असंच काहिसं घडलं पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात. मात्र, या सामन्यादरम्यान चाहत्याने केलेल्या वेडेपणापेक्षा खेळाडूने केलेल्या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या (Pakistan) डावादरम्यान एका चाहत्याने मैदानात प्रवेश केला. चाहत्याने फलंदाजी करत असलेल्या शादाब खानला (Shadab Khan) सलाम केला. प्रत्युत्तरात शादाब खानने त्या चाहत्याला मिठी मारली. त्यानंतर शादाबने मारलेल्या या मिठीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान चाहते अनेकदा सुरक्षेचा घेरा तोडून मैदानात घुसून आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही वर्षांपासून खेळाडू सतत बायो बबलमध्ये राहत असून त्यांना कोरोनाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी चाहत्यांना खेळाडूंपासून दूर राहण्यास सांगितले जात आहे. मात्र, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याचे वेगळेच दृश्य पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shadab Khan fan enter in the ground and hug him.
Best moment ????.
Video of the day.#PAKvWI pic.twitter.com/c51kmIXfMl— Wasif HafeEz (@wasi_se) June 10, 2022
या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानचा एक चाहता मैदानात आला आणि खेळपट्टीजवळ पोहोचल्यानंतर शादाबला सलाम केला. यानंतर शादाबने त्याला मिठी मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या डावाच्या ३९व्या षटकात शादाब खान नऊ धावांवर फलंदाजी करत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूपूर्वी एक चाहता मैदानात घुसला. यानंतर शादाब खानने त्याला मिठी मारली. त्यानंतर तो चाहता पुन्हा प्रेक्षक स्टँड्समध्ये गेला, पण परतताना तो आनंदाने उड्या मारत होता.
दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ १५५ धावा करू शकला आणि १२० धावांच्या मोठ्या फरकाने सामना गमावला. बाबरने ७७ आणि इमाम-उल-हकने ७२ धावा केल्या. मोहम्मद नवाजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन आणि शादाब खानने दोन गडी बाद केले. शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली. वेस्ट इंडिजकडून मायर्सने ३३ आणि ब्रूक्सने ४२ धावा केल्या. कर्णधार पूरनने २५ धावा केल्या. गोलंदाजीत अकिल हुसेनने तीन, अँडर फिलिप आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा-
होऊदे खर्च! आयपीएल संपल्यानंतर आंद्रे रसेलने घेतली नवीन लग्जरी कार, किंमत माहितीय का?
‘या’ युवा गोलंदाजाला ४ महिन्यात बनवेन भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू, मोहम्मद शमीचा दावा





