---Advertisement---

चाहत्याने ओलांडली हद्द! फोटो घ्यायला आलेल्या पाकिस्तानी खेळाडूसोबत घडलेला प्रकार पाहाच

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 7:09 PM
---Advertisement---

अनेक देशांमध्ये क्रिकेटपटूंना चाहते देवासारखे पुजतात. चाहते त्यांच्या आवडच्या क्रिकेटपटूसोबत फोटो किंवा सेल्फी घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. असे असंख्य चाहते आहेत, ज्यांनी स्वतःच्या आवडत्या क्रिकेटपटूसोबत फोटो किंवा सेल्फी घेतला आहे, पण अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, असे खूप कमी असतील, ज्यांना आपडत्या क्रिकेटपटूसोबत सेल्फी घेण्याचा योग आला होता, पण स्वतःच्याच चुकीमुळे ही संधी त्यांनी गमावली. 

होय पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि त्याच्या चाहत्यांमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. पाकिस्तानचा मध्यक्रमातील फलंदाज आसिफ अली (Aasif ali) याचा आहे. व्हिडिओ पाकिस्तान संघाच्या सराव सत्रातील आहे. यावेळी चाहते नेहमीच प्रमाणेच त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी मैदानाच्या बाहेर जमले होते. यावेळी आसिफ अली या चाहत्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी आला होता. अनेकांची आसिफसोबत फोटो घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. पण तितक्यात एका चाहत्यांने असे काही केले, जे पाहून सर्वजण हैराण आहेत.

आवडता क्रिकेटपटू जेव्हा आपल्यासोबत फोटो घेण्यासाठी येतो, तेव्हा चाहते आनंदी असतात आणि या खेळाडूसाठी त्यांच्या मनात आदर देखील असतो. पण आसिफसोबत काहीसा वेगळाच प्रकार घडला. तो जेव्हा सेफ्ली घेण्यासाठी चाहत्यांजवळ आला, तेव्हा एका चाहत्याने त्याच्याकडे मोबाईल फेकला, जो आसिफच्या चेहऱ्यावर लागला. असे सांगितले जात आहे की, चाहत्याने आसिकडे फोटो घेण्यासाठी मोबाईल टाकला होता, पण झाले उलटाच प्रकार घडला. मोबाईल डोक्यात लागल्यानंतर आसिफने क्षणाचाही विलंब न करता, त्याठिकाणावरून काढता पाय घेतला. एका चाहत्याच्या चुकीमुळे उपस्थित इतर चाहत्यांचीही चांगलीच निराशा झाली.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. परंतु, व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याविषयी ठोस माहिती अजून मिळाली नाहीये. या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर, हा व्हिडिओ जुना असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पाकिस्तान संघ सध्या टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. विश्वचषक स्पर्धा 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून पाकिस्तानला 23 ऑक्टोबर रोजी पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारतासोबत खेळायचा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धवनने ज्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये दिली नाही जागा, त्यानेच ठोकल्या 11 चेंडूत 62 धावा
नामिबियाच्या विजयात मॉर्कल बंधूंचा महत्वाचा वाटा! संघाला इतिहास रचण्यासाठी केली मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---