---Advertisement---

ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते, हार्दिकच्या व्हिडिओमुळे पेटला नवा वाद

On: सोमवार, डिसेंबर 26, 2022 3:15 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. उभय संघांत तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. टी-20 मालिकेची सुरुवात 3 जानेवारी, तर वनडे मालिका 10 जानेवारी रोजी सुरूवात होणार आहे. टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल, असे मागच्या काही दिवसांपासून सांगितले जात आहे. तत्पूर्वी मालिकेचे ब्रॉडकास्टर्स स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहते मात्र चांगलेच संतापले आहेत. 

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करणार, असे सांगितले जात आहे. मात्र, बीसीसीआयकडून याविषयी अद्याप कुठलीच घोषणा केली गेली नाहीये. असे असले तरी, ब्रॉडकास्टर्स स्टार स्पोर्ट्सने संघ घोषित होण्याआधीच हार्दिकला कर्णधार म्हणून गृहीत धरले आहे. स्टार सोप्टसने ही पोस्ट पहिल्यांदा पोस्ट केल्यानंतर डिलीट केली आणि कॅप्शनमध्ये सुधारणा करून पुन्हा पोस्ट केली. चाहते नेमका हाच मुद्दा पकडून त्यांना ट्रोल करू लागले आहेत.

https://twitter.com/MarshaII_17/status/1607015223344652288?s=20&t=XnkwKGPeygRhKJ3js1iRfg

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेसाठी स्टार स्पोर्टने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून प्रोमो शूट केला आहे. यामध्ये कर्णधार रोहितच्या जागी हार्दिक दिसत असल्यामुळे अनेकांसाठी ही आश्चर्याची बाब आहे. या व्हिडिओच्या कॅप्सनमध्ये स्टार स्पोर्टने सुरुवातीला लिहिले होते की, “हार्दिक पंड्या आशिया चषकच्या विजेत्यांसोबत एक नवीन वर्षांची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. हार्दिकच्या राज्यात भारती संयघ मोठे कामगिरी करण्यासाठी तयार आहे.”

या पोस्टमधील हार्दिकच्या राज्यात हा शब्द चाहत्यांना खटकला. पण स्टार स्पोर्टने ही पोस्ट काही वेळातच डिलीट देखील केली. व्हिडिओ पुन्हा पोस्ट करताना कॅप्शनमधील हा शब्द काढून त्यांना पोस्ट केली. ब्रॉडकस्टर्सच्या या कृत्यावर चाहते चांगलेच संतापले आहेत. अनेकजन सोशल मीडियाव व्यक्त देखील होत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, क्रिकेटपटू, ब्रॉडकास्टर्स, समालोचक आणि संघ व्यवस्थापन या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि चाहत्यांना मात्र याविषयी कल्पना नाही. नेटकरी या पोस्टवर टीका करताना दिसत आहेत.

https://twitter.com/FinisherDk/status/1607155023628349440?s=20&t=8ZlIwLGM7_5c7ZpIMoyuZA

https://twitter.com/KarnarohitMahe2/status/1607000435457691648?s=20&t=Snh2CD8Tq15mr1_AWkEv2g

https://twitter.com/AlwaysEnjoyi/status/1607074738035097601?s=20&t=WyAfmVLQeYI0YaaTJcNOTw

https://twitter.com/toecrushrzzz/status/1607053563297161216?s=20&t=wBm6ot2XGxL83eXaqk4gIA

(Fans are angry on this video of Hardik Pandya, the star is being trolled)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका 189 धावांवर भुईसपाट, ग्रीनने घेतल्या सर्वाधिक 5 विकेट्स
आफ्रिदीच्या हाती सुत्र येताच ‘हा’ दिग्गज संघाबाहेर, बाबरवर हाताची घडी घालून बघत राहण्याची वेळ  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---