देशातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आगीसारखा भडकत चालला आहे आणि यामुळे ट्विटरवर दररोज नवीन हॅशटॅग ट्रेंड होतायेत. बुधवारी (३ फेब्रुवारी) रात्री भारतीय क्रिकेटपटूंनी ‘इंडिया टूगेदर’ हा हॅशटॅग चालवत एकापाठोपाठ एक ट्विट केले. या क्रिकेटपटूंमध्ये भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. मात्र, सचिन त्याच्या ट्विटमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
सचिनचे ट्विट
शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर अमेरिकन पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांसारख्या भारताबाहेरील सेलिब्रेटींनीही प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. याच दरम्यान, सचिन तेंडुलकरने ट्विट केले की ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरचे लोक प्रेक्षक असू शकतात परंतु, यात सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत देश माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या.
सचिनच्या ट्विटनंतर चाहत्यांनी मागितली शारापोवाची माफी
सचिनने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या या ट्विटमुळे तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला असून चाहते सध्या त्याच्यावर नाराज आहेत. काही चाहत्यांनीही तर त्याच्यावर नाराज होऊन स्टार महिला टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी मागितली आहे.
खरंतर सन २०१५ मध्ये शारापोव्हाने एका मुलाखतीत म्हटले होते की ती सचिन तेंडुलकर या खेळाडूला ओळखत नाही. तिच्या या उत्तरानंतर ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. सचिनच्या अनेक चाहत्यांनी तिच्यावर कडाडून टीका केली होती.
पण, आता सचिनने शेतकरी आंदोलनाबाबत केलेले ट्विट पाहून चाहत्यांनी यू-टर्न घेतला आहे आणि शारापोवाची माफी मागितली आहे. या चाहत्यांमध्ये अधिकतर चाहते केरळचे आहेत. एका चाहत्याने म्हटले आहे की ‘शारापोवा तू सचिन बाबत योग्य होती.’ तर एका चाहत्यांने ६ वर्षांपूर्वी तिला वाईट बोलल्याबद्दल माफी मागितली आहे.
https://twitter.com/ItSGiuseppeJohn/status/1357321259101528066
https://twitter.com/sibi_tweetz/status/1357615226649272320
https://twitter.com/Bipin_rajmp/status/1357033199499575297
https://twitter.com/MhdShafeekPk2/status/1357214888989396992

सचिन व्यतिरिक्त अन्य क्रिकेटपटूंचेही ट्विट –
शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करणारा सचिन एकमेव क्रिकेटपटू नाही. त्याच्या व्यतिरिक्त विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे या क्रिकेटपटूंनीही ट्विट केले आहेत. त्यामुळे हे क्रिकेटपटूदेखील मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून होणाऱ्या टीकेचा सामना करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचा भारत दौरा, मग जो रूटचं अर्धशतक फिक्स, असं आम्ही नाही ‘ही’ आकडेवारी सांगतेय
इमरजन्सीमध्ये टीम इंडियाला येते शाहबाज नदीमची आठवण, घेतल्यात ७०० हून जास्त विकेट्स
व्हिडिओ: ‘अशी’ मिळवली बुमराहचे घरच्या मैदानावरील पहिली कसोटी विकेट, पाहून फलंदाजही अवाक्





