भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघातील हा सामना खूपच रोमांचक ठरला. खेळाडूंंनी या सामन्यात चांगले प्रदर्शन केल्यामुळे ते चर्चेत आले. पण काही चाहते देखील या सामन्यानंतर चर्चेत आले आहेत, ज्यांनी स्टॅन्ड्समध्ये हाणामारी केली.
भारतीय संघासाठी या सामन्यात सलामीवीर इशान किशनने अर्धशतकी खेळी केली आणि संघाला २११ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघासाठी मध्यक्रमातील रस्सी व्हॅन डर दुसेन आणि डेविड मिलर यांनी ताबडतोड अर्धशतके ठोकली आणि संघाला विजय मिळवून दिला. या खेळाडूंचे त्यांच्या प्रदर्शनासाठी सर्वत्र कौतुक झाले. पण अरुण जेटली स्टेडियमच्या पूर्वेकडील स्टॅन्डमध्ये असे काही चाहते उपस्थित होते, ज्यांनी त्याठिकाणी हाणामारी केली आणि चर्चेत आले. पोलीस कर्मचारी वेळेवर आल्यामुळे वाद जास्त वेळ चालला नाही. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओच्या सुरुवातील पाहिले जाऊ शकते की, दोघे जण एका व्यक्तीला मारत आहेत. पण काहीच वेळात अजून दोघेजण येतात आणि त्याच व्यक्तीला मारू लागतात. या भांडणाच्या मागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये. पण असे सांगितले जात आहे की, एक व्यक्ती अती उत्साहित होता. शक्यतो हा व्यक्ती पहिल्यांदाच स्टेडियममधून सामना पाहत होता आणि त्याच्याकडे भारताचा मोठा झेंडा देखील होता. शक्यतो याच कारणास्तव शेजारी उभ्या असलेल्या इतरांना त्याचा त्रास होत होता. याच पार्श्वभूमीवर वादाला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे, जो पुढे हातापाईमध्ये बदलला.
Exclusive video from #QilaKotla yesterday East Stand pic.twitter.com/CXgWMOse87
— Pandit Jofra Archer (@Punn_dit) June 10, 2022
दरम्यान, उभय संघात खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ विकेट्सच्या नुकसानावर २११ धावा केल्या. यामध्ये इशान किशनच्या ७६ धावांचे योगदान होते. प्रत्युत्तरात जेव्हा दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी आली, तेव्हा त्यांनी हे लक्ष्य १९.१ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. उभय संघातील दुसरा टी-२० सामना १२ जून रोजी कटकमध्ये खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कहाणी ‘दादा’लाच केकेआरमधून बाहेर काढण्याची, काय होतं गांगुलीला संघातून काढण्यामागील कारण
‘खराब फॉर्मातून जात असलेला विराट स्वत:लाच फसवतोय’, दिग्गज कर्णधाराचे लक्षवेधी भाष्य
मैदानामध्ये महिला पीत होती ‘बियर’, डेरिल मिशेलच्या षटकाराने तिला म्हटले ‘चीयर्स’