ऑस्ट्रेलियामध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय अशी बिग बॅश लीग स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेमध्ये नुकत्याच खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज ऍलेक्स हेल्सने शानदार शतकी खेळी केली आहे. हेल्सच्या या तुफानी खेळीनंतर अनेक आईपीएल प्रेमींनी चेन्नई सुपर किंग्स संघाने हेल्सला आपल्या संघात समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे.
बीबीएलच्या सिडनी थंडर संघाकडून खेळणाऱ्या हेल्सने सिडनी सिक्सर्स विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात 56 चेंडूत 9 चौकार व 8 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने शानदार 110 धावांची खेळी केली. हेल्सने आपले शतक 51 चेंडूंमध्ये पूर्ण केले होते. हेल्सच्या या शानदार शतकी खेळीमुळेच सिडनी थंडर संघाने 46 धावांनी तो सामना जिंकला.
हेल्सच्या या आक्रमक खेळीनंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून त्याचे कौतुक होत आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉर्न यांनीदेखील हेल्सला इंग्लंड पुन्हा एकदा संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच ट्विटरवर अनेक आयपीएल प्रेमींनी हेल्सला आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे.
एका सीएसकेप्रेमीनी तर, ‘चेन्नई सुपर किंग्स, कृपया ऍलेक्स हेल्सला आपल्या संघात सहभागी करा. तो बीबीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे’, असे लिहिले आहे.
You beauty!
Alex Hales brings up the second hundred in as many days at Adelaide Oval #BBL10 pic.twitter.com/gF5Ar4IVXw
— KFC Big Bash League (@BBL) January 22, 2021
https://twitter.com/RajeshMekala21/status/1352583297470091264?s=20
Come on … He deserves to get another chance … time should be a great healer … @AlexHales1 has just struck 100 off 51 balls … #BigBash #England
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 22, 2021
https://twitter.com/GHadfield_1999/status/1352609096994840576?s=20
https://twitter.com/JournalistWFH/status/1352610253469229056?s=20
What a knock from the Englishman, 110 in just 56 balls from Alex Hales. A terrific knock just before the Indian series and IPL auctions. pic.twitter.com/qVsXZ4PnPW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 22, 2021
Csk should have released more overseas players like santner,ngidi…then possibly they could easily get jhye Richardson,maxwell and Alex hales in auction.that would be a great strategy..we need a really good wicket taking fast bowler(richardon)
— Sukalyan Haldar (@SukalyanHaldar2) January 23, 2021
Do you think CSK should pick Alex Hales? for Watson? What say?
— Dilipan 🗡️🛡 (@D4Dilipan) January 22, 2021
सिडनी थंडरने केला खास विक्रम
ऍलेक्स हेल्सच्या शतकी खेळामुळे सिडनी थंडर संघाने 232 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे, बिग बॅश लीगमध्ये आजवर कोणत्या संघाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. त्यामुळे बिग बॅश लीगच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम सिडनी थंडर संघाच्या नावावर झाला आहे. त्यांच्या 233 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचा पूर्ण संघ केवळ 186 धावाच करू शकला. परिणामत सिडनी थंडरने 4६ धावांनी सहज विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत
“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा