---Advertisement---

कुठे पूजा…तर कुठे होम हवन! टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांचे देव पाण्यात

On: शनिवार, जून 29, 2024 1:43 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मधील अंतिम सामना आज (29 जून) रोजी रंगणार आहे. फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. सेमी फायनलमध्ये भारतीय संघ इंग्लंड संघास धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश मिळवला तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकाने अफगाणिस्तानला मात देऊन फायनलचे तिकिट पक्के केल होते. तर आज (29 जून) होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ आपली ताकद पणाला लावणार आहे.तर दुसरीकडे भारतीय चाहते टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रार्थना करत आहेत. भारतीय संघ जिंकण्यासाठी चाहते विविध शहरांमध्ये पूजा आणि होम हवन करत आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटूंच्या फोटोसहं चाहते मंदिरात पूजा करत असल्याचे दिसून येते. याशिवाय प्रयागराजच्या क्रिकेटपटूंनीही फायनलपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

याशिवाय, वाराणसीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये चाहते टीम इंडियाच्या फायनलमध्ये विजयासाठी प्रार्थना करताना दिसत होते. भारताच्या विजयासाठी चाहत्यांनी वाराणसीमध्ये हवन केले. यावेळी मंदिरात क्रिकेटच्या बॅट, भारतीय खेळाडूंचे फोटो आणि तिरंगा घेऊन चाहते उपस्थित होते.

खरंतर मागील सात महिन्यात भारतीय संघ दुसऱ्या आयसीसी स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचला आहे. 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ फायनल मध्ये पोहचला होता. पण भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाला समोरे जावे लागले होते. पण या विश्वचषकात भारतीय संघ ट्राॅफीसाठी प्रबळ दावेदार आहे. कारण यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्पर्धेतील 8 सामन्यातील 7 सामने जिंकाला आहे. तर भारत विरुद्ध कॅनडा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.

महत्तवाच्या बातम्या-

शिवम दुबेचा पत्ता कट? टीम इंडिया बदलणार सलामी जोडी, पाहा फायनलमध्ये भारताची संभाव्य प्लेइंग 11
हेड कोच म्हणून राहुल द्रविडचा शेवटचा सामना, ट्राॅफी जिंकून रोहित सेना देणार फेअरवेल गिफ्ट?
IND vs RSA: चाहत्यांसाठी डोकेदुखी! आयसीसी फायनलमध्ये भारताचा रेकॉर्ड खूपच खराब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---