---Advertisement---

इंग्लंड-न्यूझीलंड सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जून 27, 2022 8:36 PM
Viral-Video
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघातील हा सामना एका रमोंचक बळणावर असतानाच मैदानात असे काही घडले, ज्याच्याकडे सर्व चाहत्यांसह समालोचकांचे देखील लक्ष्य वेधले गेले.

सामन्यादरम्यान, स्टॅन्डमधून सर्व चाहते खेळाडू आनंद घेत होते. पण तितक्यात अचनक चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला. इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा शर्ट घातलेला एक व्यक्तीने सामन्यादरम्यान सर्वाचे लक्ष स्वतःकडे वेधले. त्याचे कारण होते, त्याने स्टॅन्डमध्ये घातलेला गदारोळ. हा व्यक्त शरीराने भक्कम दिसत असून स्टॅन्समध्ये त्याची एका दुसऱ्या चाहत्यासोबत चांगलीच हातापायी झाली.

सामना पाहण्यासाठी आलेल्या इतर चाहत्यांना या भांडणाचा नक्कीच त्रास झाला. सोशल मीडियावर याविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एका नेटकऱ्याने या स्टॅन्ड्समध्ये झालेल्या या वादावर एक मजेशीर टिप्पणी केली आहे. त्याने लिहिले की, “जेव्हा मैदानात पाहण्यासाठी फुटबॉलचा सामना सुरू नसतो, तेव्हा असेच काही घडते.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “क्रिकेटच्या सामन्यादरम्यान भांडणे पाहिल्याचे माला आठवत नाहीये.”

सामन्याचा पश्चिमेकडील स्टॅन्डमध्ये हा प्रकार घडल्याचे समजते. याच कारणास्तव दुसऱ्या एका वैतागलेल्या चाहत्याने इतरांना असा सल्ला दिला आहे की, जर तुम्हाला अशा प्रकराची भांडणे आवडत नसतील, तर पश्चिमेकडील टेरेसवरचे तिकिट खरेदी करू नका. अनेकांचे असे मत आहे, ज्या प्रक्षणांमध्ये ही हातापायी झाली, ते शक्यतो दारूच्या नशेत होते. ज्या प्रसंगी हा वाद चालू होता, तेव्हा इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीने विकेट गमावली होती, पण चाहत्यांचे त्याकडे लक्ष कमी होते, पण चाहत्यांमधील भांडणे मात्र सर्वजण पाहत होते.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर न्यूझीलंडने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात न्यूझीलंडने ३२९, तर इंग्लंडने ३६० धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडने आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या डावात त्यांना विजयासाठी २९६ धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने ३२६ धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

Prize Money | रणजी विजेत्या मध्य प्रदेशला मिळाले ‘डबल प्राइस’, तर उपविजेत्या मुंबईच्या खिशातही १ कोटी

INDvsSL | अट्टापट्टूच्या वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा विजयी शेवट, ७ विकेट्सने जिंकली तिसरी टी२०

कर्णधार पंड्याचं व्हिजन आयपीएल २०२३, भारत-आयर्लंड टी२०तून गुजरात टायटन्ससाठी शोधलाय हिरा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---