भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजय साजरा केला. सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला ६ गड्यांनी धूळ चारत भारताने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये टी२० मालिका विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावावेळी विराटने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना असे काही केले, ज्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा किती सन्मान करतो.
धोनीचे चाहते मैदानात काढत होते धोनीची आठवण
टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत होता. भारतीय कर्णधार विराट कोहली हा चांगला क्षेत्ररक्षक असल्याने वारंवार सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना दिसून येतो. त्याचवेळी, तो क्षेत्ररक्षण करत असताना काही भारतीय चाहत्यांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आठवण काढली. अनेक चाहत्यांनी हातामध्ये ‘वुई मिस यू धोनी’ अशा प्रकारचे पोस्टर घेतले होते. त्यावेळी ते पोस्टर पाहून विराटने असा काही इशारा केला की, ज्यामुळे विराटने तमाम चाहत्यांची मने जिंकली.
मी टूचा केला इशारा
चाहत्यांनी ‘वुई मिस यू धोनी’ असा पोस्टर दाखवल्यानंतर विराटने ‘मी टू’ असा इशारा केला. विराटच्या या कृत्याचा व्हिडिओ एका चाहत्याने इंस्टाग्रामवरून पोस्ट केला आहे. त्यानंतर या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला दिसून आला.
https://www.instagram.com/p/CIdWY4zBiyp/?utm_source=ig_web_copy_link
धोनीने घेतली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने यावर्षी १५ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होते. मात्र, तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्त्व करतो. यावर्षी चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये गुणतालिकेत सातव्या स्थानी राहिला. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना विराट कोहलीला अनेकदा मदत करताना दिसून यायचा. सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी कर्णधार विराट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण व धोनी संघाचे संचालन करताना दिसायचा.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाची वाढली डोकेदुखी; ‘हा’ प्रमुख खेळाडू होऊ शकतो पहिल्या कसोटीतून बाहेर
आयसीसीची नवी कसोटी क्रमवारी झाली जाहीर, ‘या’ भारतीय खेळाडूंचा अव्वल दहामध्ये समावेश