आयपीएल 2024 चा 53वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. धर्मशालाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाबवर 28 धावांनी शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं 20 षटकांत 167 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जची टीम 20 षटकांत 139 धावाच करू शकली.
या सामन्यात चेन्नईच्या डावात एक मोठी घटना घडली. याचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. झालं असं की, चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या सामन्यात 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. धोनी 19व्या षटकांत फलंदाजीला आला मात्र हर्षल पटेलनं त्याला पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केलं. धोनी ‘गोल्डन डक’ होऊन तंबूत परतला. हर्षल पटेलचा हा चेंडू इतका उत्कृष्ट होता की, धोनीला तो बिलकूल समजला नाही. धोनीला काही कळायच्या आत चेंडू स्टम्प्सना भेदून निघून गेला होता.
हर्षल पटेलच्या या चेंडूचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र यानंतर हर्षल पटेलला सोशल मीडियावर धोनीच्या फॅन्सचा राग झेलावा लागतो आहे. धोनीला पहिल्या चेंडूवर बाद केल्यानंतर धोनीचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून हर्षल पटेलवर राग काढत आहेत. चाहते हर्षल पटेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तुटून पडले आहेत. काही लोकांनी तर त्याला शिव्या देखील दिल्या आहेत.
एक यूजर म्हणाला, “तुझी लायकी आहे का धोनीला आऊट करायची?” तर दुसरा युजर म्हणाला, “तू ‘थाला’ला आऊट कसं काय केलं?” आणखी एक यूजरनं लिहिलं की, “तू तर आता गेलास.” मात्रा काही चाहते असेही आहेत, ज्यांनी हर्षल पटेलचं कौतुक केलं आहे. हा खेळाचा एक भाग असल्याचं या चाहत्यांनी म्हटलं आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे, पंजाब किंग्जविरुद्धच्य़ा पहिल्या सामन्यात देखील धोनी बाद झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर राग काढला होता. या सामन्यात पंजाबचा यष्टीरक्षक जितेश शर्मानं धोनीला धावबाद केलं होतं. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी जितेशला सोशल मीडियावर अशाच प्रकारे शिव्या दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
42 वर्षीय धोनीनं सर्वांना टाकलं मागे, बनला आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक
चेन्नईचे 3 सामने बाकी, आता प्लेऑफचं समीकरण काय? टॉप-४ मध्ये स्थान कसं निश्चित होईल? जाणून घ्या