---Advertisement---

PAK vs BAN: सामना पाहण्यास चाहत्यांना मैदानावर नो एँट्री…!

Pakistan Test Team vs ENG
---Advertisement---

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. (30 ऑगस्ट) पासून दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. यादरम्यान चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा कसोटी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश मिळणार नाही. कारण सध्या नॅशनल स्टेडियम कराचीमध्ये बांधकाम सुरू आहे. त्यामुळे चाहत्यांना स्टेडियममधून कसोटी पाहता येणार नाही.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर) दरम्यान खेळवला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) नॅशनल स्टेडियम कराची येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. बांगलादेशपाठोपाठ वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज असणार आहेत.

परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं बराच काळ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी भेट दिली नाही. मात्र, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे. पाकिस्तानकडे आशिया चषकाचे यजमानपद होते त्यावेळी भारतानं आशिया चषकाचे सामने श्रीलंकेत खेळले होते. त्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्ट झालं नाही.

पाकिस्तान सुपर लीगदरम्यान नॅशनल स्टेडियम कराचीचे स्टँड रिकामे दिसले होते. तिथं क्रिकेटचे चाहते फार कमी संख्येनं दिसले होते. तिकिटाची किंमत पाकिस्तानी चलनात फक्त 50 रुपये असली तरी भारतीय चलनात ही किंमत 15 रुपये आहे, पण तरीही चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी इच्छा दाखवली नाही.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भीती होती की चाहते कमी संख्येने सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतील. असे झाल्यास पाकिस्तान क्रिकेट पुन्हा अडचणीत येईल, त्यामुळे पाकिस्तान-बांगलादेश कसोटीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊ दिलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग बातमी: मोर्ने मॉर्केलची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
मुंबई इंडियन्सला रोहितच्या अटी मान्य, कर्णधार बदलणार?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आश्चर्यकारक निर्णय, कसोटी सामन्यात चक्क प्रेक्षकांवरच घातली बंदी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---