---Advertisement---

‘याच्यापेक्षा बॉटल ओपनर बरा!’, सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरलेला केएल राहुल होतोय ट्रोल

KL Rahul
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात केएल राहुल याची बॅट आतापर्यंत शांतचं आहे. पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात तो अवघ्या 4 धावा करत बाद झाला. तर आता गुरूवारी नेदरलॅंड्सविरूद्ध देखील केवळ 1 धाव बनवून त्याने तंबूचा रस्ता पकडला. तिसऱ्या षटकात मध्यम गतीचा वेगवान गोलंदाज पॉल वॅन मीकरेन याच्या चेंडूवर चकवा खात पायचीत झाला.

पंचांनी बाद घोषित केल्यानंतर राहुलने रोहितशी संवाद साधला. रोहितच्या देहबोलीवरून त्याचा रिव्ह्यू घेण्यात रस नाही असचं जाणवले. मात्र, रीप्लेमध्ये स्पष्ट दिसतं होतं की चेंडू इन लाइन पीच झाला. इन्पॅक्ट देखील इन लाइन होता, पण चेंडू स्टंप्सला सोडून जात होता. पॅड्सला लागल्यानंतर चेंडू एका कोनात बाहेरच्या दिशेने जात होता. राहुल फ्लिक करायला बघत होता, पण हुकल्यानंतर चेंडू फ्रंट पॅडवर लागला. राहुलने जर डीआरएस घेतला असता तर पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला असता.

https://twitter.com/jaynildave/status/1585534742933295105?s=20&t=7ZxiXd9ukCndtDbEJ8TkFQ

https://twitter.com/TukTuk_Academy/status/1585533605161603072?s=20&t=DWzQOlxvJRQEKkA7mVHHJQ

केएल राहुल (KL Rahul) बाद झाल्यानंतर त्याला इंटरनेटवर निर्दयीपणे ट्रोल करण्यात आलं. रोहितची भुमिका देखील ट्रोल करण्यात येत आहे. राहुल पायचीत होताना रोहित समोरच्या बाजूने उभा होता तर त्याने राहुलला डीआरएस घेण्यासाठी साथ द्यायला हवी होती जी दिली गेली नाही. काही क्रिकेट रसीकांनी केएल राहुलच्या जागी रिषभ पंत याला सामील करावं अशी मागणी केली. काहींनी राहुल बाद झाल्यानंतर मजेशीर मीम्स शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

टी 20 विश्वचषक 2022 च्या आधी झालेल्या सराव सामन्यात केएल राहुलने चांगलं प्रदर्शन केलेलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या सराव सामन्यात त्याने अर्धशतक केले होते. त्याने 33 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या होत्या. मात्र, मुख्य सामन्यांना सुरुवात झाल्यावर त्याची लय हरवली. सध्या राहुलचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयश मिळाल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळेल, याविषयी अनेकजण शंका व्यक्त करत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराट कोहलीने ऍडम गिलक्रिस्टवर सोडली छाप, एका भेटीत झाले स्पष्ट
पाकिस्तानची नाचक्की! झिम्बाब्वेने थरारक सामन्यात चारली धूळ; विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---