भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. अनेकदा धोनीला एकदा जवळून पाहण्यासाठी आणि त्याची भेट घेण्यासाठी चाहते उतावळे झाल्येचे पाहायला मिळते. शिवाय काही चाहत्यांनी वेडेवाकडे प्रकार केल्याचेही अनेकदा निदर्शनास आलं आहे. अशा परिस्थितीत जेव्हा धोनी स्वत:हून अचानक भेटलेल्या चाहत्यांसोबत वेळ घालवतो तो क्षण वाखाडण्याजोगा असतो. असाच एक प्रसंग घडला आहे रांची विमानतळावर. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एमएस धोनी चेन्नईला जाण्यासाठी रांची विमानतळावर येताना दिसत आहे. त्यांनी रांगेत उभे असलेले विमानतळ कर्मचारी आणि चाहत्यांशी हातमिळवणी केल्याचेही पाहयला मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, एमएस धोनीच्या नम्रतेने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांनी माजी भारतीय क्रिकेटपटूचे त्याच्या गोड स्वभावाबद्दल कौतुक केले आहे.
https://twitter.com/TheDhoniEra/status/1556267455151951872?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1556267455151951872%7Ctwgr%5E17b5b5e4b7f4a85832efbf74ab5755612d26a232%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fcricfit.com%2Fwatch-humbleness-ms-dhoni-former-india-skipper-greets-fans-at-ranchi-airport%2F
एमएस धोनी नुकताच इंग्लंडमध्ये त्याच्या कुटुंब आणि मित्रांसह त्याच्या लग्नाचा वाढदिवस आणि स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी होता. तो २०२२च्या विम्बल्डनमध्ये त्याच्या आवडत्या टेनिस स्टारला खेळताना पाहण्याचा आनंद घेत उपस्थित होता. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधारही इंग्लंड दौऱ्यात लंडनमध्ये भारताच्या सामन्यांसाठी उपस्थित होता. शिवाय अगदी नजीकच्या काळात रिषभ पंत, सुर्यकुमार यादव अन् भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये केवळ ३ सेकंदासाठी धोनीची झलक पाहायला मिळाली होती. मात्र, त्या ३ सेकंदाच्या जोरावर धोनी सोशल मिडीयावर ट्रेंड झाला होता.
दरम्यान, याआधीही धोनी अनेकदा चाहत्यांशी नम्रपणे व्यव्हार करताना दिसला आहे. काही महिन्यांपूर्वी धोनी त्याच्या गुडघे दुखीच्या उपचारासाठी रांचीतील अगदी छोट्या गावात झाडाखालील वैद्याकडे उपचार घेत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर धोनीचे याबाबतचे फोटोही व्हायरल झाले होते. शिवाय धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत असतानाचा पाकिस्तानी संघाच्या चाहत्याला तिकीट मिळवून देण्याचा किस्साही सर्वश्रृत आहे. त्यामुळे या व्हिडिओत धोनीचा दिसणारा साधेपणा जरी नविन नसला तरी वाखाडण्याजोगा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवर नेटकरी फिदा
VIDEO। संजूने अनोख्या अंदाजात केलं चाहत्यांचं अभिवादन, गाडीतून उतरत थेट ठोकला सलाम
आशिया चषकासाठी निवड होऊनही ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या जागेवर प्रश्नचिन्ह, अय्यरसाठी मात्र संधी!