---Advertisement---

‘प्रत्येक बाउंड्री म्हणजे टीम सिलेक्टर्संना सणसणीत चपकार’, सॅमसनच्या रौद्र रूपाचं चाहत्यांकडून कौतुक

On: मंगळवार, मे 24, 2022 10:31 PM
Sanju-Samson
---Advertisement---

आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने होते. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने धडाकेबाज प्रदर्शन केले. निर्धारित २० षटकात त्यांनी ६ विकेट्सच्या नुकसानावर १८८ धावा केल्या.

राजस्थानकडून (RR vs GT) सलामीवीर जोस बटलरबरोबर कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यानेही शानदार खेळी केली. त्याच्या विस्फोटक खेळीनंतर चाहते ट्वीटरवर व्यक्त होत आहे. अनेकांनी मजेदार मीम्स शेअर करत संजूचे कौतुक केले आहे. 

संजू सॅमसनचे धारण केले रौद्र रूप
प्रथम फलंदाजी करताना (Qualifier 1) राजस्थानने त्यांची पहिली विकेट संघाच्या ११ धावांवरच गमावली. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल केवळ ३ धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत संजूने मोर्चा सांभाळला. त्याने येताच ९ चेंडूत एकूण २४ धावा फटकावल्या. पुढे आपली आक्रमक खेळी सुरू ठेवत त्याने २६ चेंडूत १८०.७७च्या स्ट्राईक रेटने ४७ धावा फटकावल्या. त्याच्या या ताबडतोब फलंदाजीची चाहते भरपूर प्रशंसा करत (Sanju Samson Praised By Fans) आहेत. 

काहींनी तर मीम्स शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्याची ही खेळी भारतीय संघाच्या निवडकर्त्यांसाठी चपराक होती, असे म्हटले आहे. संजूला येत्या मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवडले गेलेले नाही.

https://twitter.com/ImRo745/status/1529111782161522689?s=20&t=leXJi8TEIx2vcCH69dadVg

https://twitter.com/LeagueAbove_/status/1529108549426507777?s=20&t=eXpkQLxGYcgBhdwm8MZwkw

https://twitter.com/Adityakrsaha/status/1529107641963646976?s=20&t=heRWJaBQiQxckVkZbqZorQ

राजस्थान रॉयल्सने गुजरातला दिले १८९ धावांचे आव्हान
दरम्यान राजस्थान संघाच्या या सामन्यातील डावाबद्दल बोलायचे झाल्यास, संजूने ४७ धावांची कर्णधार खेळी केली. तसेच सलामीवीर जोस बटलर याने ५६ चेंडूत ८९ धावांची शानदार खेळी केली. तसेच देवदत्त पडीक्कलने २८ धावा जोडल्या. इतर फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले. मात्र राजस्थानने संजू आणि बटलरच्या खेळीच्या जोरावर १८८ धावांपर्यंत मजल मारली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बॉल फेकतेय की योगा करतेय? मायाची बॉलिंग ऍक्शन पाहून डोकंच फिरेल; जोरदार व्हायरल होतोय व्हिडिओ

अर्धशतक न करताही सॅमसनच्या नावावर खास विक्रमाची नोंद, बनला फक्त दुसरा भारतीय पठ्ठ्या

तुझसम तूच महान! धोनीवर कितीही टीका होऊदेत, पण प्रत्येक खेळाडूला त्याच्यासारखच बनायचंय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---