साउथॅम्पटन। आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियम, एजबॅस्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरु आहे. मात्र, या सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी(२१ जून) देखील साऊथॅम्पटनमध्ये पावसाची सतंतधार सुरु असल्याने या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. या सामन्यादरम्यानचा दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
या सामन्यासाठी कार्तिक समालोचन करत आहे. तर विराट भारतीय संघाचा कर्णधार आहे. या सामन्यादरम्यान एका क्षणी विराट आणि कार्तिक एका विनोदावर हसताना दिसले आहेत. हा व्हिडिओ कार्तिकने रिट्विट केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की पावसामुळे खेळ थांबलेला आहे. तसेच समालोचन करणारा कार्तिक स्टेडियमच्या पहिल्या मजल्यावर उभा आहे, तर विराट मैदानातून ड्रेसिंग रुमकडे परतत आहे. यावेळी विराट आणि कार्तिकमध्ये काहीतरी गमतीशीर संभाषण झाले. त्यामुळे ते दोघेही एकमेकांकडे पाहून जोरजोरात हसले. मात्र, त्यांच्यात काय संभाषण झाले हे समजले नसल्याने चाहत्यांना नक्की त्यांच्यात असे काय बोलणे झाले हा प्रश्न पडला आहे.
https://twitter.com/gillfan_/status/1406683549189566466
या व्हिडिओची बरीच चर्चा झाली असून विराट आणि कार्तिकमधील संभाषणाबाबत चाहत्यांनी अनेक मजेदार अंदाज बांधले आहेत.
https://twitter.com/wannabepanda7/status/1406691684835106816
Whose instagram story is this?
— Naina (@Naina60927092) June 21, 2021
https://twitter.com/snackynicky/status/1406915108882714631
He is laughing like he said firse reh gayi century 😭😭
— Viroot (@topgun_mav11) June 20, 2021
https://twitter.com/indianspidey1/status/1406864784637665282
‘समालोचक’ कार्तिकचे कौतुक
या सामन्यात कार्तिकमधील समालोचनाचे गुण सर्वांनाच पाहायला मिळाले आहेत. तो ज्याप्रकारे समालोचन सध्या करत आहे, त्याचे अनेक दिग्गजांनीही कौतुक केले आहे. तसेच चाहत्यांनाही त्याचे समालोचन पसंतीस उतरल्याचे दिसत आहे.
सामन्यात पावसाचे सावट
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर पहिल्या दिवसापासूनच पावसाचे सावट आहे. हा सामना शुक्रवारी (१८ जून) सुरु होणार होता. मात्र, या दिवशी पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नव्हती. त्यानंतर शनिवारी (१९ जून) हा सामना सुरु झाला. मात्र, नंतर कमी प्रकाशाचा व्यत्यय आल्याने साधारण ६५ षटकांचाच खेळ झाला. तर रविवारीही याच कारणामुळे साधारण ७७ षटकांचाच खेळ होऊ शकला. त्याचबरोबर सोमवारीही दिवसाचा खेळही रद्द झाला.
या सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला आहे. तर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात २ बाद १०१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड अजून ११६ धावांनी पिछाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शुभमंगल सावधान! २ वेळा लग्न रद्द झाल्यानंतर अखेर ऍडम झम्पा चढला बोहल्यावर, पाहा फोटो
आहा…भारीच की! निसर्गाच्या सानिध्यात धोनी कुटुंबांसोबत घालवतोय वेळ; व्हिडिओत दिसला वर्कआऊट करताना
अजबच! फलंदाजाने इतका जोरात षटकार खेचला की स्वत:च्याच कारची फोडली काच, व्हिडिओ होतोय व्हायरल