भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघ सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. पहिल्या डावात चांगली फलंदाजी व गोलंदाजी केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने दुसर्या डावातही चांगली फलंदाजी केली. मात्र, भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीनंतर भारतीय कर्णधार विराट कोहली त्याच्या एका कृतीमुळे चांगलाच ट्रोल होत आहे.
दोन वेळा विराट दिसला खेळपट्टी खराब करताना
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात दोन वेळा खेळपट्टी खराब करताना दिसून आला. इंग्लंडच्या फलंदाजी दरम्यान खेळपट्टीवर त्याच्याकडून हेल्मेट पडले. तर फलंदाजी करताना धावा घेण्यासाठी तो खेळपट्टीच्या मधोमध पळताना दिसला.
विराटची ही कृती पाहून चाहते त्याच्यावर नाराज झाले. सामन्यादरम्यान ही पंच नितीन मेनन यांनी त्याला याविषयी सतर्क केले होते. ज्यावर तो पंचांशी हुज्जत घालताना दिसला. विराटला या घटनेविषयी सोशल मीडियावरून चांगलेच फैलावर घेण्यात आले. तर काही चाहत्यांनी त्याला प्रश्न देखील विचारले आहेत.
चाहत्यांनी व्यक्त केली निराशा
विराटच्या या कृतीनंतर चाहत्यांनी ट्विटरवरून त्याला प्रश्न विचारले. एका चाहत्याने लिहिले, ‘स्टीव्ह स्मिथने अशा प्रकारे काही केले असते तर, त्याच्यावर बंदीची मागणी करण्यात आली असती.’
अन्य एका चाहत्याने कोहलीवर टीका करताना लिहिले, ‘अशी वेगळी रनिंग करण्याची काय गरज होती, खेळपट्टी आधीच पाहिजे तेवढी खराब झाली आहे.’
https://twitter.com/S55JNP/status/1360882510079668224
अश्या घडल्या घटना
इंग्लंडच्या पहिल्या डावावेळी विराटने खेळपट्टीवर हेल्मेट टाकले. खरंतर, तो ते हेल्मेट रिषभ पंतकडे देत होता. मात्र, शुबमन गिल आडवा आल्याने हेल्मेट खेळपट्टीवर पडले. याच बरोबर, भारताच्या दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनसोबत फलंदाजी करत असताना विराट दोन वेळा खेळपट्टीच्या मधोमध धावताना दिसला. यावर पंचांनी आक्षेपदेखील नोंदवला होता.
https://twitter.com/S55JNP/status/1361198308530741251
विराटने या सामन्यात दुसऱ्या डावात ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच आर अश्विनसह ९६ धावांची भागीदारी केली. अश्विनने १०६ धावांची शतकी खेळी केली. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा केल्या आणि पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीसह इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान दिले.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान स्मिथवर झाले होते खेळपट्टी खराब करण्याचे आरोप –
भारताचा काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यातील सिडनी कसोटीदरम्यान अनेकांनी दावा केला होता की स्मिथने भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा बॅटींग मार्क हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्मिथने हे आरोप नाकारत तो फक्त सवयीने बॅटिंग मार्क करत असल्याचे म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सिंग इज किंग ! सहा वर्षापासून युवराजचा आयपीएलमधील ‘हा’ विक्रम कोणीही मोडू शकला नाही
चेन्नई कसोटीत भारताचा विजय पक्का! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही तसेच म्हणाल
इसके मुंह पर भी डाल सकता है..! चेन्नई कसोटीतील पंतची कॉमेंट्री तूफान व्हायरल, बघा व्हिडिओ





