इटलीच्या वेंबले स्टेडियममध्ये युरो चषक २०२० स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेतील अंतिम लढत इंग्लंड आणि इटली या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगली होती. हा सामना निर्धारित वेळेनंतर १-१ ने बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इटली संघाने ३-२ ने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान एक अनोखी घटना पाहायला मिळाली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा रोमांचक सामना सुरू असताना मैदानावर एका चाहत्याने अचानक एन्ट्री केली होती. त्याच्यामुळे सामना देखील थांबवण्यात आला होता. अर्धनग्न अवस्थेत असलेल्या या चाहत्याने मैदानावर धाव घेत सुरक्षा रक्षकांचा घाम काढला होता. सुरक्षा रक्षकांनी खूप वेळ त्याचा पाठलाग केल्यानंतर तो त्यांच्या हाती लागला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Busani_MtalanaM/status/1414337699444629507?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1414337699444629507%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcdn.embedly.com%2Fwidgets%2Fmedia.html%3Ftype%3Dtext2Fhtmlkey%3Dcb7145f1731b4c328f8e4d2201854ceaschema%3Dtwitterurl%3Dhttps3A%2F%2Ftwitter.com%2Fbusani_mtalanam%2Fstatus%2F1414337699444629507image%3Dhttps3A%2F%2Fabs.twimg.com%2Ferrors%2Flogo46x38.png
इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी घेतली पराभवाची जबाबदारी
इंग्लंडचे प्रशिक्षक गोरथ साऊथगेट यांनी इंग्लंड युरो चषक २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटली संघाविरुद्ध झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतली आहे. इंग्लंड संघ सुरुवातीला आघाडीवर होता. परंतु अतिरिक्त वेळेत हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटने लावण्यात आला होता. ज्यामध्ये इंग्लंड संघाला ३-२ ने पराभवाचा सामना करावा लागला. (Fans ran barefoot field in Euro Cup 2021 final security guards left sweat,watch video)
गोरथ साऊथगेट यांनी पेनल्टी शूट आऊटमध्ये राशफोर्ड, सांचो आणि साका यांना पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ते गोल करण्यात अपयशी ठरले. ते म्हणाले, “ही माझी जबाबदारी आहे. मी किक मारण्यासाठी खेळाडूंची निवड केली होती. एक संघ म्हणून आपल्याला पराभव किंवा विजय स्विकारावा लागतो. साकाला पेनल्टी शूट आउटला पाठवण्याचा निर्णय माझा होता. आम्ही ट्रेनिंगमध्ये त्यांच्याबरोबर काम केले होते. मी याची जबाबदारी घेतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
विक्रमी विजयानंतर घरी परतल्यावर मेस्सीचे पत्नीकडून ‘खास वेलकम’, व्हिडिओ व्हायरल
विजयाच्या जल्लोषात इटलीच्या समर्थकांनी ओलांडल्या सर्व सीमा, एकाचा मृत्यू; १५ गंभीर जखमी
‘आपण २०३० विश्वचषक आयोजित करण्याच्या पात्रतेचे आहोत का?’ केविन पीटरसनचा संतप्त सवाल