भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी २०११ म्हटलं तरी विश्वचषक चटकन डोळ्यासमोर उभा राहातो. याचवर्षी भारतीय क्रिकेट संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. त्यावेळी तो सचिन तेंडुलकरचा कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक होता आणि तब्बल २८ वर्षांनंतर भारताला तो जिंकण्यात यश मिळाले होते. त्यामुळे तो विश्वचषक अनेक अर्थांनी अविस्मरणीय होता.
याच विश्वचषकाला यावर्षी १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सध्या आयसीसीच्या विश्वचषकाच्या ट्विटर हँडेलवर रोज या विश्वचषकातील काही खास घटनांबद्दल ट्विट, तसेच व्हिडिओ शेअर करण्यात येत आहेत.
दरम्यान, या ट्विटर हँडेलवर भारताचा माजी कर्णधार धोनी आणि श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगा यांचे चेहेरे एडिट करुन त्यांना एकच क्रिकेटपटू केलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. तसेच या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘डिपिंग यॉर्कर्स, स्लिप कॅचेस, हेलिकॉप्टर शॉट. तो हे सर्व करु शकतो. सादर आहे, एमएस मलिंगा.’
Dipping yorkers. Slip catches. Helicopter shots. He can do it all…
Presenting MS Malinga.#CWC11Rewind pic.twitter.com/89WxAtmZvy
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 15, 2021
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
आयसीसीने जरी हे गमतीने पोस्ट केले असले तरी मात्र काही चाहत्यांना हा एडिट केलेला फोटो बिलकूल पसंतीस पडलेला नाही. अनेकांनी तर असं करण्याची गरज काय, असे प्रश्नही विचारले आहेत. तसेच अनेकांनी हा फोटो डिलिट करण्याची मागणी केली आहे. मात्र काही असे चाहते आहेत, ज्यांनी या फोटोवर गमतीशीर प्रतिक्रियाही दिली आहे. काहींनी म्हटले आहे की ‘धोलिंगा’, ‘महेंगा’ असे नाव द्यायला हवे होते.
@CancellerBot delete
— Chirag???? (@ChiragCr24) March 15, 2021
https://twitter.com/DiveshS31356290/status/1371465212444901378
Why but?
— Shrey (@selectorshrey) March 15, 2021
Delete it
— 3 Slips and a Gully (@srikar_st) March 15, 2021
Worst photoshop
— decade2030 (@decade2030) March 15, 2021
Delete pic.twitter.com/n96FB78G4h
— AK (@Kumar_Ap07) March 15, 2021
Like there is no content left in the world? We can't find anything to tweet? Nothing?? https://t.co/sSzKH7OePo
— absy (@absycric) March 16, 2021
This is so unnecessary https://t.co/yHU5rPxHNg
— monmore_tipster (@Obo2010R) March 16, 2021
Delete this please ???????????????????????????????? https://t.co/vYAprT1naB
— Vkeys (@lerato_molekane) March 15, 2021
Kyu kalakari krni h bhai plsss leave my man???? https://t.co/Un21wDarCE
— shri (@cupidwindyyy) March 15, 2021
लसित सिंह धोलिंगा????????????????????
— ROHIT.BISHNOI (@The_Kafir_boy) March 15, 2021
Can have different names
1. DhoLinga
2. MaDho
3. MaliNi
4. MahiLinga
5. LasitEndra
????????????????— Subh???????? (@subhadeepdas14) March 16, 2021
Hit helicopter shot on his own bowling.
Presenting Keeper batsman bowler
-Dholinga— Jaayyy???? (@jaylad776) March 15, 2021
भारताने जिंकला होता अंतिम सामना
साल २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात यजमान भारत आणि श्रीलंकेने प्रवेश केला होता. या दोन संघात २ एप्रिल २०११ रोजी अंतिम सामना झाला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यावेळी धोनीने विजयी षटकार खेचला होता. तो षटकार आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करुन आहे.
तसेच त्याच सामन्यात मलिंगानेही त्याच्या गोलंदाजीने प्रभाव पाडला होता. त्याने विरेंद्र सेहवागला शुन्यावर आणि सचिन तेंडुलकरला १२ धावांवर बाद करत भारताला अडचणीत आणले होते. मात्र, नंतर २७५ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून गौतम गंभीर (९७) आणि एमएस धोनी (९१*) यांनी अर्धशतके झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
धोनी, मलिंगा निवृत्त
एमएस धोनीने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. तसेच मलिंगानेही कसोटी आणि वनडेमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता केवळ आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ बुमराहच नाही, तर ‘या’ ५ क्रिकेटपटूंनाही स्पोर्ट्स अँकर्सने प्रेमाच्या पिचवर केलंय ‘क्लिन बोल्ड’
‘एप्रिल-मे महिन्यात मालदीव अप्रतिम असतं’; राजस्थान रॉयल्सकडून बुमराहला लग्नाच्या भन्नाट शुभेच्छा
ईशानच्या पदार्पणावेळी घरात होते ‘असे’ वातावरण; आई करत होती पुजा, तर वडील…






