भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना नुकताच संपन्न झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ३७२ धावांनी विजय मिळवला आहे. यासह २ कसोटी सामन्यांची मालिका १-० ने आपल्या नावावर केली आहे. या मालिकेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. दरम्यान या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (४ डिसेंबर) चेतेश्वर पुजाराने असे काही केले, ज्यावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना वर्षानुवर्षे लक्षात ठेवला जाईल. या सामन्यात एजाज पटेलने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. भारतीय संघाचा पहिला डाव सुरू असताना त्याने १० फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. असा कारनामा करणारा तो केवळ तिसराच गोलंदाज ठरला होता, तर हा कसोटी सामना आणखी एका खास कारणासाठी लक्षात ठेवला जाईल.
चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघातील मुख्य फलंदाज आहे. तो संथ गतीने फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. परंतु, न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने एक गगनचुंबी षटकार मारत सर्वंनाच आश्चर्यचकित केले होते. २०१९ नंतर त्याने पहिल्यांदाच षटकार मारला होता. चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत एकूण ९२ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १५ षटकार मारण्यात यश आले आहेत.
हा षटकार पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “लोकांना आज स्टेडियममध्ये क्वचित घडणाऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या.पाहिली गोष्ट म्हणजे, एका डावात १० गडी बाद तर दुसरी गोष्ट म्हणजे, चेतश्वर पुजाराचा षटकार.”
दुसऱ्या एका युजरने लिहीले की, “चेतेश्वर पुजाराने कारकिर्दीतील पंधरावा षटकार मारला, त्यासाठी त्याने १४,८०० पेक्षा अधिक चेंडू खेळून काढले.”
तसेच आणखी एका युजरने अक्षर कुमारचा मिम शेअर लिहिले की, “भाई किस लाईन मे आ गये आप…”
People who entered stadium witnessed 2 rare things today :
– A 10 wicket haul in an innings
– Six hit by Chetheshwar Pujara#INDvsNZ
— Friday Matinee (@VRFridayMatinee) December 4, 2021
Pujara hits a six😜 #INDvzNZ #pujara pic.twitter.com/kaMoNUSXyM
— ପାର୍ଥ ମୋଦୀ (@elLjfrn8DVxyEb6) December 4, 2021
Cheteshwar Pujara Hits his 15th Test career Six.
Balls Faced 14800+ pic.twitter.com/7COT3SfQOo
— Q. (@Johannesburg149) December 4, 2021
Those who missed Pujara's six be like#INDvzNZ #INDvsNZ pic.twitter.com/JvIUWuitDk
— Rakesh Dash (@rakeshdash_) December 4, 2021
https://twitter.com/noonecreate/status/1467092127955910656?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1467092127955910656%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fcheteshwar-pujara-hits-a-six-fans-are-surprised-are-reacting%2F
Pujara hits six in a test match; Ashwin right now 🤣 #INDvzNZ pic.twitter.com/cLRqd8X0eE
— ପାର୍ଥ ମୋଦୀ (@elLjfrn8DVxyEb6) December 4, 2021
If pujara can hit six I can also pass a sem with 9 cgpa. MOTIVATION BC pic.twitter.com/OiL4QORKik
— Vinay Nirmal (@vinkacasm) December 4, 2021
When Pujara hits six suddenly 🤣 pic.twitter.com/ze3TYrQgAp
— 50 shades of HARI (@harishreddy08) December 4, 2021
Cheteshwar Pujara Just Hit Six In #INDvzNZ Match
Whole India : pic.twitter.com/0j2yMVCpE3— Ruchit Kukadiya (@ruchitkukadiya) December 4, 2021
Pujara hitting a SIX…#INDvzNZ #TestCricket
Meanwhile dressing room… pic.twitter.com/NFCHidrtN0— jenish viradiya (@viradiya_jenish) December 4, 2021
या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ५४० धावांचे आव्हान दिले होते, या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला ५६.३ षटकांत सर्वबाद १६७ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
लाईव्ह सामन्यात जेव्हा विराट कोहलीने घेतली कॅमेरामनची फिरकी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
जेव्हा क्षेत्ररक्षण करताना एजाजचा स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद, व्हिडिओ व्हायरल
‘फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी अगरवालच्या फलंदाजीतून घेतला धडा’, न्यूझीलंडच्या अर्धशतकवीराचा खुलासा