---Advertisement---

पप्पा विराटची झेरॉक्स कॉपी आहे ‘वामिका’, तिसऱ्या वनडेदरम्यान दिसली पहिली झलक; तुम्हीही बघा

On: सोमवार, जानेवारी 24, 2022 9:14 AM
Virat-Kohli-Vamika-Kohli
---Advertisement---

नुकताच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (ENG vs IND) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील अंतिम सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने झुंज दिली. परंतु ही झुंज अपयशी ठरली. तो अवघ्या ६५ धावा करत माघारी परतला. दरम्यान या सामन्यातील विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मुलगी वामिका (Vamika)चा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आतापर्यंत वमिकाचा चेहरा जगासमोर येऊ दिला नव्हता. त्यांचे असे म्हणणं होते की, जोपर्यंत तिला स्वतःहून वाटत नाही, तोपर्यंत तिचा चेहरा जगासमोर आणला जाणार नाही. परंतु तिसऱ्या वनडे सामन्यात कॅमरामनची नजर वामिकावर पडली आणि बघता बघता हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हे पाहून चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.

व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने विराट कोहलीचा बालपणीचा फोटो ट्विट केला आहे. तसेच त्याने वमिकाचा फोटो देखील कोलाज केला आहे. यावर त्याने कॅप्शन म्हणून “वमिका ही विराट कोहलीची झेरॉक्स कॉपी आहे.” तसेच दुसऱ्या रका युजरने लिहिले की,”जसे वडील तशीच मुलगी.” तसेच आणखी एका युजरने प्रतिक्रीया देत लिहिले की, “विराट कोहलीची मुलगी एका परीसारखी दिसते.”

https://twitter.com/PKDHONIII/status/1485266953711517701?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1485266953711517701%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fsports-hindi%2Fcricket-news-ind-vs-sa-3rd-odi-vamika-is-xerox-copy-of-virat-kohli-check-out-fans-funny-comments-5201832%2F

https://twitter.com/HariKrish_D95/status/1485198717938696197?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1485198717938696197%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Flatest%2Fvirat-kohli-daughter-virat-kohli-daughter-vamika-face-shown-during-india-vs-south-africa-3rd-odi-69112%2F

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने सर्वाधिक १२४ धावांची खेळी केली होती. तर रासी वान डर दूसेनने ५२ आणि डेविड मिलरने ३९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या डावात २८७ धावा करण्यात यश आले होत. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. तर शिखर धवनने ६१ धावांचे योगदान दिले. परंतु भारतीय संघाला दिलेले आव्हान गाठता आले नाही. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ४ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या :

अफगानी कर्णधार त्याच्या मुलासोबत खेळू इच्छितोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट; म्हणाला, ‘आशा आहे की आम्ही…’

तमिल थलाईवाजने केला सहावा सामना टाय! जयपूरसाठी नितीन रावलची निर्णायक रेड

हे नक्की पाहा:

आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---