मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील सातवा सामना गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीने राजस्थानला १४८ धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे आव्हान २ चेंडू बाकी ठेवत ७ विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वी पूर्ण केले. राजस्थानच्या या विजयात ख्रिस मॉरिसने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
मॉरिसची वादळी खेळी
मॉरिस राहुल तेवतिया बाद झाल्यानंतर १५ व्या षटकात फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी डेव्हिड मिलर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत होता. मिलर एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत असताना मॉरिसची बॅट मात्र सुरुवातीला शांत होती. मिलर १६ व्या षटकात बाद झाल्यानंतरही १८ व्या षटकापर्यंत मॉरिसने धोका पत्करत फटकेबाजी केली नव्हती. पण १९ व्या आणि २० व्या षटकात मात्र, मॉरिसची बॅट कडाडली.
अखेरच्या दोन षटकांत राजस्थानला २७ धावांची गरज होती. यावेळी मॉरिसने १९ व्या षटकात कागिसो रबाडाविरुद्ध २ षटकारांसह एकट्याने १५ धावा वसूल केल्या. त्यामुळे अखरच्या षटकात राजस्थानला १२ धावांची गरज होती. यावेळीही मॉरिसने टॉम करन विरुद्ध षटकातील दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने शेवटच्या २ षटकात वादळी खेळ करताना एकूण १८ चेंडूत ४ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली.
त्याच्या या खेळीनंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी आठवण करुन दिली की मॉरिसला राजस्थानच्या पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक देण्यास नकार दिला होता. सध्या सोशल मीडियावर याबद्दल अनेक मीम्सही चाहत्यांकडून शेअर केले जात आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही यावर गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने मॉरिसचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. तसेच कॅप्शन दिले आहे की ‘पहिल्या फोटोमध्ये, पैसे मिळाले पण इज्जत नाही मिळाली. दुसऱ्या फोटोमध्ये, याला म्हणतात इज्जत. इज्जत पण पैसे सुद्धा. खूप चांगला खेळला मॉरिस.’
https://twitter.com/virendersehwag/status/1382754314066685952
चाहत्यांच्या प्रतिक्रिया –
https://twitter.com/VivekVermaa45/status/1382761879274201090
https://twitter.com/kbc_____/status/1382760107268657152
https://twitter.com/Ritesh_7l/status/1382754772793520131
https://twitter.com/crickethutiyapa/status/1382757122081841152
https://twitter.com/dhivakar_rraj/status/1382755262549823490
https://twitter.com/adam_styris/status/1382755087039143936
https://twitter.com/iamaashmehta/status/1382754892771512326
https://twitter.com/aadarshdixit2/status/1382754234341367808
https://twitter.com/KarmaniDevanshu/status/1382754005479133184
मागच्या सामन्यामध्ये सॅमसनने स्ट्राईक घेण्यास दिला होता नकार
मुंबई येथे १२ एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा चौथा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात पंजाबने अवघ्या ४ धावांनी राजस्थानच्या जबड्यातून विजय खेचून घेतला होता.
झाले असे की पंजाबच्या २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाला अखेरच्या दोन चेंडूवर ५ धावांची गरज होती. त्यावेळी राजस्थानकडून शतकी खेळी करणारा सॅमसन स्ट्राईकवर होता. तर मॉरिस नॉन स्ट्रायकर होता. त्यावेळी पाचव्या चेंडूवर सॅमसनने स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवत मॉरिसला एकेरी धाव घेण्यास नकार दिला होता. पण अखेरच्या चेंडूवर सॅमसनने विजयी षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दिपक हुडाने सीमारेषेजवळ त्याचा झेल घेत संघाला सामना जिंकून दिला.
या घटनेनंतर सॅमसनवर खूप टीका झाली होती. मात्र, राजस्थान संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराने सॅमसनचा बचाव करत त्याला पाठिंबा दिला होता.
मॉरिस आयपीएल लिलावाच्या इतिहासातील महागडा खेळाडू
चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयपीएल २०२१ लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने तब्बल १६.२५ कोटी रुपये मोजत खरेदी केले होते. त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला. आत्तापर्यंत कोणालाही एवढी किंमत मिळाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
भन्नाट! स्टॉयनिसला बाद करताना बटलरने पकडला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
सेहवागचा हिंदी गाण्यातून सनरायझर्सला छुपा संदेश, केले ‘हे’ ट्विट






