---Advertisement---

आक्रमक फलंदाजी अन् हटके शॉट! चाहते म्हणाले, हा भविष्यातील ‘मिस्टर ३६०’, पाहा कोण आहे तो फलंदाज

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 4:40 PM
Rassie van der Dussen
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामान्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना पार्लमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघातील शतकवीर फलंदाज रस्सी वॅन डर ड्यूसेन (Rassie van der dussen) आपल्या खेळीमुळे चर्चेचा विषय ठरतोय. त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजासोबत होऊ लागली आहे.

बोलॅंड पार्कच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. परंतु, त्यानंतर ड्यूसेन आणि तेंबा बावुमा (Temba bavuma) यांनी शतकी खेळी करत २०४ धावांची भागीदारी केली. ड्यूसेनने या डावात ९६ चेंडूंमध्ये १२९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीनंतर त्याची तुलना दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्स (Ab de Villiers) सोबत होऊ लागली आहे.

ड्यूसेनने या डावात तुफान फटकेबाजी केली. त्याची खेळी पाहून अनेकांनी त्याला भविष्यातील एबी डिविलियर्स, असे म्हटले आहे. एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “मला खात्री पटत नाहीये की, मी ड्यूसेनला फलंदाजी करताना पाहतोय की, एबी डिविलियर्सला.” तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शम्सी याने ट्वीट करून, त्याला त्याच्या खेळाचा आनंद घेऊ द्या असे म्हटले आहे.

त्याने ट्विट करत लिहिले की, “त्या मुलाला खेळू द्या आणि खेळाचा आनंद घेऊ द्या. दिग्गजासोबत तुलना केल्याने त्याच्यावर नको असलेला दबाव येईल.”

दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या उभारला २९६ धावांचा डोंगर
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, रस्सी वॅन डर ड्यूसेनने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. तर तेंबा बावुमाने ८ चौकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला ५० षटकांअखेर ४ बाद २९६ धावा करण्यात यश आले.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने ५१ आणि शार्दुल ठाकूरने नाबाद ५० धावांचे योगदान दिले. परंतु, भारतीय संघाला ५० षटकांअखेर अवघ्या २६५ धावा करण्यात यश आले.

महत्वाच्या बातम्या :

धोनीच्या कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या कारची भर! लिलावात खरेदी केली ‘ही’ क्लासिक गाडी

धक्कादायक! भारताचे सहा क्रिकेटर कोरोना पॉझिटीव्ह, स्वतः प्रशिक्षकांवर खेळाडूंना पाणी पाजण्याची आली वेळ

हे नक्की पाहा:

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---