---Advertisement---

नेटकऱ्यांनी दिला रहाणेला ‘फेअरवेल’; सोशल मीडियावर व्हायरल होतायेत भन्नाट मीम्स

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 6:55 PM
ajinkya-rahane-test
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs india) यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार जोहान्सबर्गच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोघेही पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहेत. पुजारा पहिल्या डावात अवघ्या ३ धावा करत माघारी परतला. तर अजिंक्य रहाणे गोल्डन डकवर माघारी परतला. हे दोघेही फलंदाज बाद झाल्यानंतर चाहते भलतेच निराश झाले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे.

चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही महिन्यांपासून सतत फ्लॉप ठरत आहे. अजिंक्य रहाणेने २०२० -२१ मध्ये एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अवघ्या ३८० धावा केल्या आहेत. तर २०२१ मध्ये त्याने ५ कसोटी सामन्यात अवघ्या १७३ धावा केल्या आहेत. ही आकडेवारी पाहता त्याला संघात स्थान मिळणे ही कठीण होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याला कसोटी संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. ही कामगिरी सुरू राहिली तर त्याला भारतीय संघातून देखील बाहेर करण्यात येऊ शकते.(Fans started trolling after flop show of Ajinkya Rahane and Cheteshwar pujara)

फ्लॉप कामगिरीनंतर भन्नाट मिम्स व्हायरल

एका युजरने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “रहाणे गोल्डन डकवर बाद झाला आणि चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा बाद झाला आहे. कोण यांना पुन्हा पुन्हा संधी देत आहे ..?” तर दुसऱ्या एका युजरने अजय देवगणचा प्रसिद्ध मिम ‘कुछ नही बदला यार आज भी सब कुछ वैसे का वैसे ही है..’ शेअर केला आहे. ज्यावर त्याने लिहिले आहे की, “पुजारा ३३ चेंडूंमध्ये ३ धावा करत बाद, अजिंक्य रहाणे १ चेंडूंवर ० धावा करत बाद…”

https://twitter.com/AbdullahNeaz/status/1477942426039828481?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1477942426039828481%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fsa-vs-ind-2nd-test-when-pujara-rahane-fail-again-memes-share-fans-get-angry-made-such-jokes-2686010

तर एका युजरने अजिंक्य रहाणेला फेअरवेल देत असल्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये फोटोशॉप करून विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन आणि भारतीय संघातील सर्व खेळाडू अजिंक्य रहाणेला फेअरवेल देताना दिसून येत आहेत.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या फ्लॉप शो नंतर आता चाहत्यांनी दोघांना संघाबाहेर करण्याची मागणी करायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले होते. परंतु पुढील सामन्यात त्याला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बुम बुम बुमराह!! रबाडाच्या बाऊन्सरवर बुमराहचा कडक षटकार; पत्नी संजनाने दिली अशी रिॲक्शन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मोठा खुलासा, भारतीय दौऱ्यावर झाले होते लैंगिक शोषण

हे नक्की पाहा :

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---