बुधवारी (२८ जुलै) कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी -२० सामना खेळला गेला. या सामन्यात संघातील मुख्य खेळाडू उपलब्ध नसल्याने ४ मोठे बदल करण्यात आले होते. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत श्रीलंका संघाने ४ गडी राखून बाजी मारली. यासह ही मालिका १-१ ने बरोबरीवर आली आहे. परंतु या सामन्यात यष्टिरक्षण करत असलेल्या संजू सॅमसनने एक मोठी चूक केली होती, ज्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे.
हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. तसेच भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु श्रीलंका संघातील खेळाडूंनी जोरदार प्रत्युत्तर देत या सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर यष्टिरक्षक संजू सॅमसनला चाहत्यांनी धारेवर धरले आहे.(Fans started trolling sanju Samson after he refused to take DRS)
तर झाले असे की, आठवे षटक सुरू असताना कुलदीप यादव गोलंदाजी करण्यासाठी आला होता. तर दासून शनाका फलंदाजी करत होता. कुलदीपने टाकलेल्या चेंडूवर शनाकाने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न फसला आणि चेंडू पॅडला जाऊन धडकला. पंचांकडे जोरदार मागणी केली गेली परंतु ती मागणी पंचांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर कर्णधार शिखर धवन, कुलदीप यादव आणि संजू सॅमसन यांच्यात डीआरएस घेण्यावर चर्चा झाली होती. कुलदीप यासाठी सहमत होता. परंतु संजू सॅमसनने नकार दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर जेव्हा रिव्ह्यू घेण्यात आला त्यात स्पष्टपणे दिसत होते की, फलंदाज बाद आहे.
हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की, “संजू सॅमसन बॅटनेही काही करू शकला नाही आणि डीआरएस पण चुकीचा घेतला.” तर आणखी एका युजरने लिहिले की, “संजू सॅमसन फलंदाजीही करू शकत नाही आणि डीआरएस घ्यावा की नाही हे पण ओळखू शकत नाही.”
That is a terrible wide call
— Harsha Bhogle (@bhogleharsha) July 28, 2021
Sanju Samson no good with Bat, no good with DRS! #IndvsSL
— Harshdeep Singh (@_harshdeep) July 28, 2021
Sanju Samson
❌can't bat
❌Can't judge lbw DRS #SLvIND https://t.co/RmKwJ8vD3I— Biji pandey (@PeterParker7194) July 28, 2021
Sanju Samson-
Can't play spin.
Can't keep wickets against spin.
Can't do keeping properly 😞Need to up his game big time.#SLvsIND #SLvIND #ShikharDhawan #SanjuSamson #Samson #INDvsSL #ShikharDhawan #Kuldeep #hasaranga #Stumping #Drop #sakariya #bhuvi #INDvSL
— JIGS JD (@jigs_jd1806) July 28, 2021
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ बाद १३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने खेळलेल्या नाबाद ४० धावांची खेळी केली. हा सामना श्रीलंका संघाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला. पुढील तिसरा आणि शेवटचा सामना २९ जुलै रोजी होणार आहे.