भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करत असून लवकरच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी(१५ डिसेंबर) एक पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्याला खोटे ठरवले होते. या पत्रकार परिषदेनंतर क्रिकेट चाहत्यांनी सौरव गांगुलीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याला काही दिवसांपूर्वी वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य वाटले होते. त्यावेळी सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्पष्टीकरण देत म्हटले होते की, “ज्यावेळी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यावेळी आम्ही त्याला असे करू नको अशी विनंती केली होती. परंतु त्याने असे करण्यास नकार दिला होता.”
आता विराट कोहलीने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, “ज्यावेळी मी टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मला कोणी ही अडवले नव्हते. त्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले होते.”
सौरव गांगुली सोशल मीडियावर ट्रोल
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनंतर चाहत्यांनी सौरव गांगुलीला धारेवर धरलं आहे. एका युजरने लिहिले आहे की, “विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची आणि सौरव गांगुलीची पोलखोल केली आहे. हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले नाहीये.”
तसेच दुसऱ्या एका युजरने सौरव गांगुली आणि जय शाहला ट्रोल करण्यासाठी प्रसिद्ध हिंदी मालिका, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील दया बेनचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच एका युजरने तर सौरव गांगुलीला चक्क जोकर देखील म्हटले आहे.
https://twitter.com/tmkoc_loops/status/1413852897138327559?t=cPSRR2KvTbwmJoJkesQgdA&s=19
https://twitter.com/MrSastaMemer/status/1471030473509900290?t=bEdVqRhOQiDcsHy7TTsa-w&s=19
"I was informed 1.5 hours before removing from ODI Captaincy " Virat kohli in press conference before south Africa tour. #BCCI
Wahh Dada wahh #SouravGanguly #viratkholi pic.twitter.com/wqUOCb4sF1— Sunil (@SunnilJadhav) December 15, 2021
https://twitter.com/JatothGanesh16/status/1471341459089461249
VIRAT ????????????#ViratVsBCCI pic.twitter.com/2dJoeEgVa6
— Incipient (@beyond_uni) December 16, 2021
Cricket twitter mast 2 mahina aapas me fight karega aur end me Dada aur VK camera pe aake photo-op karenge for the sake of Indian cricket's reputation#ViratVsBCCI #DadaVsKohli pic.twitter.com/WiSkWdJWla
— Aunuendo (@Aunu1103) December 15, 2021
https://twitter.com/bettercallgram/status/1471066026318000130
https://twitter.com/smileandraja/status/1471037634617225221
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत म्हटले की, “मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी नेहमीच उपलब्ध होतो आणि उपलब्ध आहे. मी कधीच बीसीसीआयकडे विश्रांती घेण्यासाठी संपर्क साधला नव्हता. मी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेसाठी उपलब्ध आहे आणि होतो.”
महत्वाच्या बातम्या :
स्मृती लागली विश्वचषकाच्या तयारीला! व्यक्त केला विजयाचा निर्धार
पाकिस्तानचे पुन्हा हसू! माजी कर्णधारच म्हणतोय, ‘प्रेक्षक कुठे आहेत?’
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट






