---Advertisement---

‘तो का खेळतोय?’ चाहत्यांकडून ‘या’ भारतीय खेळाडूला संघाबाहेर करण्याची होतेय मागणी

On: मंगळवार, नोव्हेंबर 30, 2021 6:11 PM
Team-India
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी अनूकुल परिस्थिती होती, पण भारतीय गोलंदाज शेवटच्या ५२ चेंडूत एकही विकेट घेऊ शकले नाहीत आणि शेवटची विकेट घेता न आल्याने सामना अनिर्णीत करण्यात आला. यानंतर भारतीय चाहते गोलंदाजांनव निराश झाले आहेत.

भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने या सामन्यात खूपच सामान्य प्रदर्शन कले, ज्यामुळे चाहते त्याच्यावर संतापलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर चाहते त्याला ट्रोल करत आहेत आणि त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी देखील करत आहेत.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात संघातील गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, पण ईशांत शर्माचे प्रदर्शन असमाधानकारक राहिले. याच कारणास्तर चाहते त्याच्यावर संतापले आहेत. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात १५ षटके गोलंदाजी केली आणि एकही विकेट घेतली नाही. यादरम्यान त्याने ३५ धावा दिल्या. तर दुसऱ्या डावात त्याच्या बोटाला दुखापत झाला.

त्याने या दुखापतीसह सात षटके टाकली आणि एकही विकेट घेतली नाही. दुसऱ्या डावात त्याने २० धावा दिल्या. यानंतर चाहत्यांनी त्याला दुसऱ्या कसोटीपूर्वी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याची मागणी केली आहे.

एका नेटकऱ्याने ईशांतवर निशाणा साधताना लिहिले की, “आश्चर्य आहे की, ईशांत शर्मा का खेळत आहे? त्याची कारकीर्द संपली आहे, कारण त्याच्या गोलंदाजीत कसलाच स्विंग नाहीय आणि गती देखील राहिली नाहीय.”

एका दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “भारताच्या कसोटी संघात ईशांत काय करत आहे, मी माझ्या आयुष्यात देखील काहीच करत नाहीय.” एका ट्वीटर वापरकर्त्याने लिहिले की, “ईशांत शर्माला मायदेशातील कसोटी सामन्यांमधून बाहेर करण्याची वेळ आली आहे. तो आता फिट नाहीय.”

https://twitter.com/WittyManeesh/status/1465288082249302021

दरम्यान, इशानने या सामन्यात खूपच कमी गोलंदाजी केली असून देखील सर्वाधिक नो बॉल टाकले. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात दोन नो बॉल टाकले. दरम्यान, न्यूझीलंडला सामन्यात विजय मिळवण्यासाठी शेवटच्या डावात २८४ धावांचे लक्ष्य होते. न्यूझीलंडने पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ९ बाद १६५ धावा केल्या आणि सामना अनिर्णीत केला. न्यूझीलंडच्या एजाज पटेल (२) आणि रचिन रवींद्र (१८) शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले आणि सामना अनिर्णीत केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

Kanpur Test: भारताच्या ‘या’ ३ चूका, न्यूझीलंडसाठी ठरल्या प्लस पॉईंट; नाहीतर खूप सोपा होता विजय

कर्णधार रहाणेच्या ‘या’ चूकीने सामना विजयाची गमावली संधी, ऑस्ट्रेलियन दिग्गज संतापला

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ‘या’ ३ खेळाडूंनी भारतीय संघात ठोकलीय दावेदारी, एकाने केलीत ९ शतके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---