मेलबर्न येथे २६ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने आपली प्लेईंग इलेव्हन आज जाहीर केली. पहिल्या कसोटी सामन्यातील संघात भारताने एकूण चार बदल केले आहेत. मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांना पदार्पणाची संधी मिळाली असून रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
मात्र या संघात केएल राहुलचा समावेश नसल्याने क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फलंदाजी मजबूत करण्याच्या दृष्टीने राहुलला संघात स्थान मिळेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला संघाबाहेरच ठेवले आहे. भारतीय संघाच्या निर्णयामुळे चाहते नाखुश असून अनेकांनी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सोशल मिडीयावर ट्रोल केले आहे.
चाहत्यांनी केला रोष व्यक्त
केएल राहुलला संघात स्थान न मिळाल्याने अनेक चाहत्यांनी सोशल मिडीयावर राग व्यक्त केला. अनेकांनी रवी शास्त्री या निर्णयामागे असल्याचे म्हणत त्यांना ट्रोल केले. एका चाहत्याने या संघनिवडीवर कमेंट करताना रवी शास्त्री प्रशिक्षक असेपर्यंत रोहित शर्मा आणि केएल राहुल कसोटी संघात आपले स्थान निर्माण करू शकणार असे म्हंटले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने रवी शास्त्री प्रशिक्षक असताना रमेश पोवार देखील आपल्याला संघात खेळताना दिसू शकेल, अशी खिल्ली उडवली आहे.
For KL Rahul and Rohit Sharma to play consistently, Ravi Shastri should be SACKED! Else he will ruin their careers.
— SMACera (@SMACeraTech) December 25, 2020
Never say Never under Ravi Shastri + Virat's management skills. Never. Don't doubt that even Ramesh Power might play in future playing 11 & Pujara might play his last test series.
— Amit (@ChughAmit07) December 25, 2020
Team selection for 2nd test is absolute scrap. How does one explain K L Rahul's omission.? Are the rest, better than him.?
Ravi shastri and team management have gone mad..
They are going to lose in 3 days.— Dr Gautam/ಡಾ॥ ಗೌತಮ್ 🇮🇳 (@DrgautamSk) December 25, 2020
राहुल आहे सर्वोत्तम लयीत
भारताचा मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित सदस्य असलेला केएल राहुल त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असल्याचे मत अनेक आजी-माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. २०२० सालच्या न्यूझीलंड दौऱ्यापासून राहुल धावांची लयलूट करतो आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक धावा काढत राहुल ऑरेंज कॅपचाही मानकरी ठरला होता. मर्यादित षटकांच्या सामन्यात आणि कसोटी सामन्यात फरक असला तरी राहुलच्या या फॉर्मचा भारतीय संघाला कसोटी सामन्यात नक्कीच फायदा झाला असता. विशेषतः भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली अपत्यजन्मासाठी मायदेशी परतल्यानंतर त्याच्या जागी राहुलला संधी मिळेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र त्याला संधी न मिळाल्याने भारतीय संघावर टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, हे दोन खेळाडू करणार पदार्पण
– तो काहीही करू शकतो, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याआधीच पंतचा ऑसी कर्णधाराने घेतला धसका
– विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे सोन्यासारखी संधी