भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आशिया चषक २०२२ साठी कसून सराव करत आहे. संयुक्त अरब अमिरातीला (युएई) पोहोचल्यानंतर लगचेच रोहितने नेट्समध्ये घाम गाळायला सुरुवात केली आहे. परंतु संधी मिळताच तो लहान मुलांप्रमाणे मस्ती करताना दिसला. गुरुवारी (२५ ऑगस्ट) बीसीसीआयने त्याचा स्केटींग स्कूटरवरून राईड मारतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. आता त्या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक मजेदार प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
Vroooming 🛴 into the end of practice session – Captain @ImRo45 style 👌 👌#TeamIndia | #AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/OqF9eksgCP
— BCCI (@BCCI) August 25, 2022
एका चाहत्याने त्याच्या व्हिडिओवर ट्विट करत लिहिले,
“रोहित तू आता पुन्हा दुखापतग्रस्त होऊ नको. आधीच तू फक्त दोन-तीन मॅच खेळतो. आता पुन्हा दुखापतग्रस्त होऊन रिषभ पंतला नेतृत्व देऊन तुला निवृत्त व्हावे लागेल. तू आणि विराट युवा खेळाडूंची जागा अडवत आहात.”
अन्य एका चाहत्याने लिहिले,
“हा टॉयलेट क्लिनर मैदानावर काय करत आहेत?”
इतरही काही चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
भारतीय संघ आपल्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध करेल. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीनंतर हाँगकाँगशी भिडणार आहे. हा सामना ३१ ऑगस्टला दुबईत होईल. त्यानंतर सुपर फोरचे सामने खेळले जाणार आहेत. ११ सप्टेंबर रोजी दुबई येथे स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल.
आशिया चषक २०२२ साठी भारत संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून
मुंबईचे क्रीडापटू मयूर व्यास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या ‘लाइफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स’ ने गौरव
सरावानंतर विराट भेटला पाकिस्तानच्या फॅनला, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील