आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा अपयशी ठरला. त्याला केवळ एक धाव बनवता आली. त्याच्या या अपयशानंतर आता सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, मुंबईच्या वरच्या फळीतील तीनही फलंदाजांना अपयश आले. ईशान किशन 13 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. कॅमरून ग्रीन याला 4 चेंडूत 5 धावाच करता आल्या. मुंबईने 6 षटकात 3 विकेट्स गमावत 29 धावा केल्या होत्या. यादरम्यान रोहितने देखील 10 चेंडू खेळले. यादरम्यान त्याला एक जीवदानही मिळाले. मात्र, तो या जीवनाचा फायदा घेऊ शकला नाही व एका धावेवर तंबूत परतला.
त्याच्या या अपयशानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले. एका चाहत्याने त्याचे छायाचित्र पोस्ट करत लिहिले,
https://twitter.com/SportyVishaI/status/1642537390781923329?t=o_47LDC1vGBQF3P3PdwJmg&s=19
‘विश्वास ठेवा हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. कृपया आता निवृत्ती घेऊन भारतीय संघ व मुंबई इंडियन्सला सोड’
https://twitter.com/jeenelagahun/status/1642552506638270467?t=eDp8ax0Z39mZ18ccug_cLA&s=19
अन्य एका चाहत्याने लिहिले,
‘रोहितला बसवून आता अर्जुन तेंडुलकरला संधी देण्याची वेळ आली आहे.’
या सामन्यात मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी पूर्णतः अपयशी ठरली. संघाचे पहिले चार फलंदाज केवळ 48 धावांवर माघारी परतले. त्यानंतर युवा तिलक वर्मा व नेहल वढेरा यांनी भागीदारी करत मुंबईला शंभरी पार नेले. अखेरीस तिलकने अर्शद खानसह संघाला सन्मानजनक 171 धावांपर्यंत पोहचवले. तिलकने नाबाद 84 धावांची खेळी केली.
(Fans Troll Rohit Sharma After His Failure Against RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 1 धाव करूनही हिटमॅन ‘रेकॉर्ड बुक’मध्ये! सचिननंतर रोहित दुसराच
रोहित शर्माचा भीमपराक्रम! IPL 2023च्या पहिल्या सामन्यात 1 धावेवर बाद होऊनही केला ‘हा’ रेकॉर्ड