चेन्नई। इंग्लंडने मंगळवारी(९ फेब्रुवारी) भारताविरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २२७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका तर झालीच पण याबरोबरच रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्याबद्दलही नाराजीचे सूर उमटताना दिसले.
चेन्नई कसोटीत रोहित, रहाणे फ्लॉप –
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रहाणेने पहिल्या डावात १ तर दुसऱ्या डावात शुन्य धाव केली. तर रोहित पहिल्या डावात ६ आणि १२ धावा केल्या. या दोघांची खराब कामगिरीचा भारतालाही मोठा फटका बसला, कारण हे दोघेही संघातील अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या खेळण्याची चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, हे दोघेही मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावर चाहत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
संघातून काढून टाकण्याची होत आहे मागणी
अनेक चाहत्यांनी रहाणे आणि रोहितवर जहिरी टीका केली आहे. काही चाहत्यांनी रहाणे आणि रोहितवर टीका करताना त्यांना संघातून काढून टाकण्याची देखील मागणी केली आहे.
https://twitter.com/Savitr13/status/1359008199060328453
https://twitter.com/Keshab81087994/status/1359492159666147334
https://twitter.com/GoatKohli18/status/1359491344826208258
https://twitter.com/Savitr13/status/1359008199060328453
@MatKashbakihai Rahane fell short of yet another 💯 but 100 runs.
Overall contribution of 1 run in a test match 👌🏻— Exploited taxpayer (direct) (@Im_UditPatel) February 9, 2021
चेन्नई कसोटीत पराभव –
नुकत्याच पार पडलेल्या चेन्नई कसोटीत भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याआधी इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती.
यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर ४२० धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघासमोर आहेत ‘या’ चार समस्या
‘या’ ७ खेळाडूंनी एक दोन नाही तर सलग तीन कसोटीत जिंकलाय सामनावीर पुरस्कार
“कर्णधारपद सोडण्याची योग्य वेळ कोहलीला माहिती आहे”, माजी खेळाडूने केली पाठराखण