---Advertisement---

रोहित शर्माबद्दल ‘तसं’ ट्वीट करणे स्वीगीला पडले महागात; मागावी लागली चाहत्यांची माफी

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 12:02 AM
---Advertisement---

देशातील सर्वात मोठ्या अन्न पोहोचवणाऱ्या माध्यमांपैकी एक असणारे स्विगी माध्यम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ट्विटरवर स्विगीने रोहित शर्माचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यावर रोहित शर्माच्या चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे.

मंगळवारी(१३ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना सुरु होण्याच्या आधी स्विगीने रोहित शर्मावर एक कमेंट केली, जी त्यांनाच महागात पडली आहे. सोशल मीडियावर रोहित शर्मावर ट्विट केल्यानंतर त्याचे चाहते स्विगी माध्यमावर चिडले आणि त्यांनी #BoycottSwiggy (बॉयकॉटस्विगी) हा हॅशटॅग चालू केला.

कोलकाता आणि मुंबई संघात सामना होण्याच्या अगोदर ब्लेड रनर नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने रोहित शर्माचा फोटोशॉप केलेले एक मीम शेअर केले होते. या फोटोशॉप केलेल्या मीममध्ये रोहित वडापावच्या गाडीवर झेपावलेला दिसत आहे. एकप्रकारे अशा प्रकारची टीका रोहित शर्माच्या तंदुरुस्तीला उद्देशून झाली आहे.

या ट्विटवर स्विगीनेही प्रतिक्रिया दिली, त्यांनी लिहिले की, द्वेष करणारे म्हणतील की हा फोटो फोटोशॉप केलेला आहे.

https://twitter.com/NotMK45/status/1381950538988756999

https://twitter.com/HarshRo45_/status/1381955850340769793

https://twitter.com/RajAryanTrue/status/1381951787943403521

स्विगीने मागितली माफी
स्विगीच्या या टिप्पणीवर रोहित शर्माचे चाहते प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी स्विगीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल झाल्यावर स्विगीने सांगितले की आम्ही एका मजेने एका चाहत्याचे ट्विट रिपोस्ट केले होते. आम्ही तो फोटो स्वत: तयार केला नव्हता, परंतु आम्ही मान्य करतो की आम्ही काही यापेक्षा वेगळी भाषा वापरायला हवी होती. आम्हाला कोणालाही दुखवायचे नव्हते.’

https://twitter.com/swiggy_in/status/1381983202957398016

मुंबईचा रोमहर्षक विजय 
मंगळवारी रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय नोंदविला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शानदार गोलंदाजीमुळे पाच वेळाच्या चॅम्पियन मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स संघाला 10 धावांनी पराभूक करत या हंगामातील प्रथम विजय नोंदविला.

महत्त्वाच्या बातम्या –

राशिदचा ‘तो’ अप्रतिम झेल पाहिला का? व्हिडिओ होतोय व्हायरल

SRHvsRCB : बेंगलोरच्या गोलंदाजांच्या अखेरच्या क्षणी टिच्चून मारा; हैदराबादवर ६ धावांनी मिळवला विजय

‘या’ कारणामुळे विराटने मला आणि झम्पाला इडीयट्स म्हटले होते, मॅक्सवेलने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---