---Advertisement---

रोहितसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी; पण तो म्हणाला, ‘देवासोबत कोण बोलतं’, पाहा भावनिक प्रसंग

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 2:26 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माची गणना जगातील सर्वात उत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. भारतामध्ये आणि जगभरात त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. रोहितने आजपर्यंत अनेक जागतिक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. त्याला क्रिकेटविश्वात ‘हिटमॅन’ या नावाने ओळखले जाते.

रोहितचा एक चाहता अमिताभ बच्चनचा ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात स्पर्धकाच्या रूपात पोहोचला होता आहे. त्याचे नाव प्रांशु आहे आणि त्याने कार्यक्रमात रोहित शर्माविषयी त्याच्या मनातील आदर व्यक्त केला आहे. कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन यांनी रोहित शर्माला व्हिडिओ कॉल लावून प्रांशूला आश्चर्यचकित केले आहे.  प्रांशुने रोहितला सर्वांपुढे देवाचा दर्जा देत लाखो मने जिंकली आहेत.

कार्यक्रमात अमिताभने प्रांशुला रोहित शर्मा आणि त्याची प्रेयसी यांच्यातील कोणत्यातरी एकाची निवड करायला लावली होती आणि त्याच्यासाठी हा एक कठीण प्रश्न बनला होता. त्याने हा प्रश्न सात कोटी रुपयांच्या प्रश्नापेक्षा जास्त अवघड असल्याचे सांगितले. पण प्रांशुने रोहित शर्माचे केलेले कौतुक आणि त्याच्या मनातील आदर पाहून अमिताभने त्याच्यासाठी रोहितसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची व्यवस्था केली. रोहितला अचानक व्हिडिओ कॉलवर पाहून प्रांशुला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याचे हाव-भाव पाहून रोहितही आनंदी झाला.

कार्यक्रमात रोहितला स्क्रीनवर पाहून प्रांशुच्या भावना अनावर झाल्या आणि तो म्हणाला की, ‘त्याला नाही माहित की, त्याच्या देवासोबत कसे बोलायचे?’ यादरम्यान अमिताभ म्हणतात की, ‘मी सांगु शकत नाही की हे (प्रांशु) तुमचे किती मोठे चाहते आहेत. आता समोर आले आहेत तर बोलून घ्या.’ त्यानंतर प्रांशु म्हणतो की, ‘सर देवासोबत कोण बोलतं?’ क्रार्यक्रमातील या भावनिक प्रसंगाचा टीजर सोनी टीव्ही नेटवर्कने शेअर केला आहे आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे.

रोहित सध्या यूएईमध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामने खेळण्यसाठी दाखल झाला आहे. तो आयपीएलमध्ये पाच वेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळतो आहे. पण दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत मुंबईचे कर्णधारपद कायरन पोलार्डने सांभाळले होते. मुंबई इंडियन्सचा संघ यावर्षी पुन्हा एकदा आयपीएलचे जेतेपद जिंकून विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्नात असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

लाईव्ह सामन्यात पंतमुळे फुटलं असतं कोणाचं तरी डोकं, पठ्ठ्यानं केलीच अशी करामत; बघा VIDEO

दिल्ली पुन्हा नंबर १, पण हैदराबाद जवळजवळ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती

अवघ्या १८ धावा करूनही साहाचा खास विक्रम, ओलांडला ‘इतक्या’ हजारांचा टप्पा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---