ढाका। बांगलादेश विरुद्ध विंडीज यांच्यात शेरे बांगला स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला.
विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सर्वबाद 190 धावा केल्या. यामध्ये सलामीला आलेल्या एविन लुईसने आक्रमक सुरूवात केली. यामुळे विंडीजच्या पहिल्याच षटकात 12 धावा झाल्या.
लुईसने यावेळी 36 चेंडूत तुफानी 89 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 षटकार आणि 6 चौकार मारले. तर त्याचा स्ट्राईक रेट 247.22 एवढा होता. त्याने अबू हैदरच्या षटकातच चार षटकार खेचले.
लुईसचा खेळ बघून बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने चेंडू महमुदुल्लाहला दिला. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूतच लेविसला त्रिफळाचीत केले. तर त्याच्या पुढच्याच चेंडूमध्ये स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमेयरला पायचीत केल्याने महमुदुल्लाह हॅट्ट्रीकवर होता. पण त्याची हॅट्ट्रीक पूर्ण झाली नाही.
यावेळी लुईसचे टी20 मधील तिसरे शतक थोडक्यात मुकले.
लक्ष्याचा पिछा करण्यास बांगलादेशची अडखळतच सुरूवात झाली आहे. त्यांनी 10 षटकातच 7 गडी गमावले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यत या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील एक-एक सामना जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–योगाचार्य होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू सोडणार होता क्रिकेट
–या व्यक्तीच ऐकलं तर अश्विन येऊ शकतो तिसऱ्या कसोटीत ओपनिंगला
–२०१९ चा विश्वचषक जिंकला तर कर्णधार कोहलीला करावे लागेल गांगुलीचे हे भन्नाट चॅलेंज पूर्ण