---Advertisement---

कमबॅक करताच आर्चरचा दक्षिण आफ्रिकेत धमाका; कामगिरी अशी की, मुंबई इंडियन्सही होईल खुश

On: गुरूवार, फेब्रुवारी 2, 2023 12:43 PM
Jofra-Archer-And-Rohit-Sharma
---Advertisement---

इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. यातील पहिले दोन सामने यजमान संघाने जिंकले, तर शेवटच्या वनडे सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. मालिका गमावली असली, तरीही इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने सामन्यात 6 विकेट्स घेत दमदार पुनरागमन केल्याचे दाखवून दिले. त्याच्या या प्रदर्शनाने कदाचित मुंबई इंडियन्स संघदेखील खुश झाला असेल.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर इंग्लंड संघाला क्लीन स्वीपची भीती होती. मात्र, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि डेविड मलान यांच्या शतकामुळे संघाने 346 धावा कुटल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याच्या भेदक माऱ्याचा सामना करावा लागला. या सामन्यात यजमान संघाचा डाव 43.1 षटकात 287 धावांवरच संपुष्टात आला.

मालिकेतील पहिल्या वनडेत अवघी 1 विकेट घेतल्यानंतर आर्चरला दुसऱ्या वनडे सामन्यातील अंतिम अकरा खेळाडूंमध्ये घेण्यात आले नव्हते. मात्र, तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्यासोबतच आर्चरने जुन्या लयीत धारदार गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात 9.1 षटके गोलंदाजी करताना 60 धावा देत 40 धावा देत सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. वनडे क्रिकेटमध्ये विकेट्सचे पंचक पूर्ण करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती.

दीर्घ काळानंतर पुनरागमन करणे सोपे नाही
आर्चरने या सामन्यात 6 विकेट्स घेतल्यानंतर म्हटले की, “दीर्घ काळानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. जेव्हा तुम्ही खेळण्यास सुरुवात करता, तेव्हाच तुम्हाला समजते की, तुम्ही सातत्याने सुधारणा करत आहात.”

जोफ्रा आर्चर आयपीएल
आयपीएल 2022मध्ये दुखापतग्रस्त असल्यामुळे आर्चरला खेळता आले नव्हते. मात्र, त्यानंतर आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीपासूनच त्याच्या फिटनेसमुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघही चिंतेत होता. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या वनडेत केलेल्या धमाक्यामुळे आर्चरने त्याचा फिटनेस दाखवून दिला आहे. तसेच, मुंबई इंडियन्स संघालाही सुखद धक्का दिला आहे. (fast bowler jofra archer completely fit to play ipl season 16 announces his comeback with 6 wicket haul )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमनचे कमी वयात भारताकडून टी20त शतक, पण वनडे अन् कसोटीत शतक मारणारे युवा भारतीय कोण?
‘प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वत:च्या जोरावर…’, हार्दिक पंड्याने सांगूनच टाकले नेतृत्वाच्या यशाचे रहस्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---