भारत-इंग्लंड (India vs England) संघातील दुसरा टी20 सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगला आहे. दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दुसऱ्याही टी20 सामन्यात संधी मिळाली नाही. दुसऱ्या टी20 सामन्यात शमीला भारतीय संघात संधी मिळेल, असे वाटत होते, पण तसे झाले नाही.
चेन्नई टी20 सामन्यापूर्वी मोहम्मद शमीने (Mohammed Shami) नेटमध्ये सरावादरम्यान खूप घाम गाळला. यानंतर, शमी प्लेइंग इलेव्हनमध्ये असू शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. पण शमीला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही. भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदलांसह खेळत आहे. रिंकू सिंह (Rinku Singh) आणि नितीश कुमार रेड्डीच्या (Nitish Kumar Reddy) जागी ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
त्याच वेळी, अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) तंदुरुस्तीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु तो चेन्नई टी20 साठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. पण शिवम दुबे (Shivam Dube) आणि रमनदीप सिंह (Ramandeep Singh) यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे, परंतु दोन्ही अष्टपैलू खेळाडू तिसऱ्या सामन्यापासून उपलब्ध असतील.
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग 11- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या-
25 वर्षीय भारतीय खेळाडूनं जिंकला ‘आयसीसी मेन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार!
IND vs ENG; भारतानं जिंकला टाॅस, ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा वगळले!
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी गिल फॉर्ममध्ये परतला, झळकावले शानदार शतक, टीकाकारांची बोलती बंद!