इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपुढे 201 धावांचे आव्हान ठेवले होते. कोलकाताने एवढ्या धावा केल्या असल्या, तरीही विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल या सामन्यात फलंदाजीत फ्लॉप ठरला. त्याला 2 चेंडूत फक्त 1 धाव करता आली. रसेलला तंबूचा रस्ता दाखवण्याचं काम मोहम्मद सिराज याने केले.
ही घटना कोलकाता संघाच्या 19व्या षटकात घडली. हे षटक मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) टाकत होता. सिराजच्या या षटकातील अखेरच्या चेंडूवर आंद्र रसेल (Andre Russell) याला मोठा फटका मारता आला नाही. सिराजने शानदार यॉर्कर टाकला, या चेंडूचे रसेलकडे कोणतेही उत्तर नव्हते. रसेलने चेंडू मारण्यासाठी बॅट फिरवली खरी, पण चेंडू इतका वेगवान होता की, थेट स्टंप्सला जाऊन लागला. मजेशीर बाब अशी की, सिराजने या शानदार चेंडूपूर्वी तीन चेंडूत 14 धावा खर्च केला होत्या.
सिराजच्या या शानदार यॉर्करचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दुसरीकडे, कोलकाताच्या डावाबाबत बोलायचं झालं, तर जेसन रॉय आणि एन जगदीशन यांनी कोलकातासाठी 9 षटकात 82 धावांची सलामी भागीदारी रचत संघाला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांची सुरुवात पाहून असे वाटत होते की, हे दोन्ही फलंदाज बेंगलोरविरुद्ध मोठी भागीदारी उभारतील. मात्र, बेंगलोरचा वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाक याने एकाच षटकात 2 विकेट्स घेत सामन्याची दिशा पालटली.
What a Yorker from Mohammad Siraj. pic.twitter.com/7mlT5wyk6Q
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 26, 2023
यानंतर कोलकाताचा डाव गडगडताना दिसत होता, पण कर्णधार नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी मिळून पुन्हा डाव सांभाळला. तसेच, एक मोठी धावसंख्या उभारली. रिंकू सिंग याने डेविड वीजा याच्यासोबत काही शानदार शॉट्स मारले आणि आपल्या संघाला 200 धावांपर्यंत पोहोचवले. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 20 षटकात 8 विकेटस गमावत 179 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना कोलकाताने 21 धावांनी नावावर केला. (fast bowler mohammed siraj clean bowled andre russell in rcb vs kkr ipl 2023 see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबचा ‘हा’ खेळाडू WTC फायनलमध्ये ठरू शकतो पंतचा चांगला पर्याय, इंग्लंडच्या दिग्गजाने सांगितले नाव
कार्तिकने धोनीला म्हटले GOAT, तर आयपीएलचा सर्वात दुर्लक्षित खेळाडू म्हणून घेतले ‘या’ धुरंधराचे नाव