सनरायझर्स हैदराबाद संघाला शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएल 2023च्या 29व्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने हैदराबादला 7 विकेट्सने धूळ चारली. या सामन्यात हैदराबादच्या ताफ्यात उमरान मलिक या वेगवान गोलंदाजाचाही समावेश होता. आपल्या वेगवान गोलंदाजामुळे कमी काळात नावारुपाला आलेला उमरान आधीसारखी कामगिरी करताना दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर त्याच्याकडून ज्या अपेक्षा केल्या जात होत्या, त्या पूर्ण करताना दिसत नाहीये. अशात चेन्नईविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारताच्या माजी वेगवान गोलंदाजने त्याला सल्ला दिला की, आपल्या प्रशिक्षकाकडून जाऊन धडे घेतले पाहिजेत.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 134 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने 18.4 षटकात 3 विकेट्स गमावत 138 धावा चोपल्या. अशाप्रकारे सामना 7 विकेट्सने जिंकला.
हैदराबाद संघाने वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याच्यावर खूपच विश्वास दाखवला होता. मात्र, तो हा विश्वास सार्थ ठरवताना दिसत नाहीये. ‘वेगाचा बादशाह’ म्हणून ओळखला जाणारा उमरान एकेवेळी आयपीएलमध्ये खळबळ माजवणारा गोलंदाज म्हणून चर्चेत होता, पण आता त्याची ओळख फक्त वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज म्हणूनच राहिलीये. तो मागील हंगामापासूनच विकेट घेण्यासाठी संघर्ष करत आहे.
आयपीएल 2023मध्ये आतापर्यंत 5 सामने खेळलेल्या उमरानने फक्त 1 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक सामन्यात त्याला 1 विकेट घेतानाही संघर्ष करावा लागत आहे. चेन्नई संघाविरुद्ध त्याला एकही विकेट घेता आली नाही.
आरपी सिंगचा सल्ला
अशात भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग (RP Singh) याने उमरान मलिक याला चेन्नईच्या सामन्यातच खास सल्ला दिला. तो म्हणाला की, “सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन आहे. त्याने जावं आणि त्याच्याकडून काहीतरी शिकून यावं. या हंगामात जो कोणी फलंदाज आहे, त्याला वेगवान चेंडूने काहीच फरक पडणार नाहीये.”
उमरान मलिक याने या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांविरुद्ध प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. त्यानंतर त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 2 विकेट घेतल्या. यानंतर त्याला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 1 विकेट घेता आली, तर चेन्नईविरुद्ध त्याच्या विकेटचा कोटा रिकामाच राहिला. (fast bowler umran malik should go an learn from sunrisers hyderabad bowling coach dale steyn in ipl 2023 this pacer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हाताची घडी, कान उघडे! सामन्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंनी धोनीकडून घेतले क्रिकेटचे धडे, कोचही सामील
‘हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आणि…’ हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर धोनीचे खळबळजनक भाष्य