विशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात कोहलीने वन-डेत भारतात ४ हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
त्याने केवळ ८१ सामन्यात भारतात ५९.८९च्या सरासरीने ४०१३ धावा केल्या आहेत. यापुर्वी केवळ सचिन तेंडूलकर आणि एमएस धोनी यांनाच ही कामगिरी करता आली आहे.
सचिनने १६४ सामन्यात ४८.११च्या सरासरीने ६९७६ धावा केल्या आहेत तर धोनीने १२४ सामन्यात ५६.२६च्या सरासरीने ४३९० धावा केल्या आहेत.
भारतात जलद ४ हजार धावा करणारे फलंदाज (डाव)
७८- विराट कोहली
९२- सचिन तेंडूलकर
१००- एमएस धोनी
वनडेत सर्वात जलद कोणत्याही देशात ४ हजार धावा करणारे खेळाडू (डाव)
७८- विराट कोहली, भारत
९१- एबी डिव्हीलिर्स, दक्षिण आफ्रिका
९२- सचिन तेंडूलकर, भारत
१००- एमएस धोनी, भारत
१०३- डीन जोन्स, आॅस्ट्रेलिया
महत्त्वाच्या बातम्या:
–पहिल्यांदाच आजी-माजी कर्णधार कोहली-धोनीबद्दल असे घडले
–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट
–असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट