गोवा: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाला एडब्लूइएस करंडक स्पर्धेत तिसऱ्या लढतीत डेंपो स्पोर्ट्स क्लबकडून १-३असा पराभवाचा सामना करावा लागला.
गोवा येथील टिळक फुटबॉल मैदानावर झालेल्या या लढतीत सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी बचावात्मक धोरण स्वीकारले. दोन्ही संघानी आपला बचाव अभेद्य ठेवत गोल होऊ न देण्याची खबरदारी घेतली. त्यामुळे पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला.
उत्तरार्धात मात्र डेंपो एससी संघाच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. ५६व्या मिनिटाला डेंपोच्या मारिओ मॅसिअर्स याने गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सहाच मिनिटांनी डेंपोच्या जेस्सल कार्नेरोने गोल करून संघाला २-०अशी आघाडी मिळवून दिली. ६८व्या मिनिटाला लातेश मांद्रेकरने गोल करून संघाला ३-०अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
सामन्यात पिछाडीवर असलेल्या एफसी पुणे सिटीच्या खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केले. अखेर ७७व्या मिनिटाला जेकब व्ही याने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून हि १-३ने कमी केली. सामना बरोबरीत सोडविण्यासाठी एफसी पुणे सिटीच्या आघाडीच्या फळीने जोरदार चाली रचल्या, पण त्या डेंपोच्या मध्यरक्षकांनी यशस्वी होऊ दिल्या नाहीत.
निकाल:
एफसी पुणे सिटी: १(जेकब व्ही. ७७ मि.)पराभूत वि.डेंपो स्पोर्ट्स क्लब: ३(मारिओ मॅसिअर्स ५६मि., जेस्सल कार्नेरो ६२मि., लातेश मांद्रेकर ६८मि.).
–नोवाक जोकोविच तिसऱ्यांदा युएस ओपनचा विजेता
–Video: धाव घेताना केएल राहुलचा निघाला शुज; बेन स्टोक्सने केली मदत
–पदार्पणातच अर्धशतक करणारा हनुमा विहारी द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील