---Advertisement---

“देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बोलावणे येते तेव्हा…”, टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाची प्रतिक्रिया

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 4:37 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर २३ मार्चपासून या दोन संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी शुक्रवारी (१९ मार्च) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या वनडे संघात ३ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचाही समावेश आहे. आता भारतीय संघात निवड झाल्याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

भारताच्या संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या प्रसिद्ध कृष्णाने ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जेव्हा बोलावणे येते तेव्हा खूप मस्त वाटते. हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. संघाच्या यशात योगदान देण्यासाठी आणि माझी भूमीका निभावण्यासाठी उत्सुक आहे. बीसीसीआय धन्यवाद. ही सुरुवात करण्याची जास्त वाट पाहू शकत नाही.’

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून आणि इंडियन प्रीमीयर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने मागील काही महिन्यांत प्रभावित केले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये ७ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत.

प्रसिद्ध कृष्णाची कारकिर्द 

प्रसिद्ध कृष्णाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ सामने खेळले असून २०.२६ च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ४८ अ दर्जाच्या सामन्यात २३.०७ च्या सरासरीेने ८१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ४० ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांत ३३ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २४ सामने खेळले असून यात १८ विकेट्स घेतल्या आहेत.

नव्या चेहऱ्यांना संधी

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात प्रसिद्ध कृष्णासह आणखी २ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात कृणाल पंड्या आणि सुर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. साल २०१८ मध्ये कृणालने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर जवळपास ३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळणार आहे. तसेच सुर्यकुमारने नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता त्याला भारताच्या वनडे संघातही संधी मिळाली आहे.

पुण्यात होणार वनडे मालिका 

भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील तीनही सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे पार पडणार आहेत. हे सामने अनुक्रमे २३, २६ आणि २८ मार्च रोजी होतील. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

बाबर आझमच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे दिले आदेश

INDvENG: संघ अडचणीत असताना का मैदानाबाहेर गेला कर्णधार कोहली? स्वत:च केला खुलासा

चौथ्या टी२०त तीन खेळाडू होते ‘प्लेअर ऑफ द मॅच’चे मानकरी, अखेर ‘याने’ मारली बाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---