विश्वचषक 2023 च्या 41व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्सने शानदार विजय नोंदवला. या विजयासह किवी संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. मात्र, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अजूनही या शर्यतीत आहेत पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडला मागे टाकून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणे त्यांच्यासाठी कठीण आहे. या स्पर्धेदरम्यान आतापर्यंत किवी संघाला चाहत्यांचा आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. त्याबद्दल संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने खास कृतज्ञता व्यक्त केली आहे.
न्यूझीलंड संघाने विश्वचषक स्पर्धेतची सुरुवात धमाकेदारपणे केली होती आणि त्यांनी पहिले चार सामने सलग जिंकले होते, परंतु त्यानंतर पुढील चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्याता वर्तवली जात होती. मात्र, श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर किवी संघ चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
शुक्रवारी (10 नोव्हेंबर) न्यूझीलंड संघाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये लाॅकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) संघाला पाठिंबा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानत आहे. तो म्हणाला, “आमच्या सर्व चाहत्यांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे आभार जे आम्हाला येथे राहून पाठिंबा देत आहेत. मला माहित आहे की दोन्ही देशांमधील वेळेच्या फरकामुळे ते इतके सोपे नाही. विश्वचषकात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. मला आशा आहे की तुम्ही आमच्या खेळाचा आनंद घेत आहात.”
https://www.instagram.com/p/CzbtbI0PKdV/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
लाॅकी फर्ग्युसन याच्या गोलंदाजाच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर फर्ग्युसनने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये 23.60 च्या सरासरीने दहा विकेट्स घेतल्या आहेत. या काळात 19 धावांत 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. (Ferguson thanks fans for supporting New Zealand team watch video)
म्हत्वाच्या बातम्या
बॅटर नाही, तर विकेटकीपर म्हणून चमकला डी कॉक! अफगाणिस्तानविरुद्ध मोडला धोनीचा ‘तो’ Record
हुश्श शेवटी पकडलाच! रहमतला तंबूत पाठवण्यासाठी मिलरने केली प्रयत्नांची पराकाष्ठा, पाहा व्हिडिओ