---Advertisement---

फिफा विश्वचषक: १९९०नंतर इंग्लंड प्रथमच उपांत्यफेरीत, हर्षा भोगले-जेम्स अॅंडरसनचा कौतुकाचा वर्षाव

On: रविवार, जुलै 8, 2018 12:18 PM
---Advertisement---

समारा | २०१८ च्या फिफा विश्वचषकात शनिवारी (७ जुलै) झालेल्या इंग्लंड वि. स्वीडन यांच्यातील उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

या सामन्यात इंग्लंडकडून ३० व्या मिनिटाला हॅरी मैग्यूरो आणि डेल अलीने ५८ व्या मिनिटाला हेडरद्वारे अप्रतिम गोल करत इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.

समारा फुटबॉल अरेना येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा पराभव करत  तब्बल २८ वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

यानंतर तब्बल २८ वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या इंग्लंड फुटबॉल संघावर क्रिकेट आणि फुटबॉलमधील अनेक दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला.

यामध्ये क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले, इंग्लंडचा क्रिकेटपटू जेम्स अॅंडरसन, माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन आणि इंग्लंडचे प्रथम श्रेणा क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्लेषक अॅलन विल्कीन्स यांचा समावेश आहे.

आजपर्यंतच्या २१ फिफा विश्वचषकापैकी १५ विश्वचषकात सहभागी झालेल्या इंग्लंडने १९६६ साली प्रथम एकमेव विश्वचषक जिंकाला आहे.

आपल्या दुसऱ्या विश्वचषक विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेला इंग्लंड संघाने २०१८ फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडत मारत विजेतेपदाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.

उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यातील विजयी इंग्लड आता अंतिम सामन्यात आपले तिकीट फिक्स करण्यासाठी बुधवारी (११ जुलै) क्रोएशिया विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन हात करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा

-२०१० साली झालेल्या आयपीएल स्पर्धेतील मोठ्या घटनेचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment