फिफा विश्वचषकाला सुरूवात झाल्यापासून जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे अनेक अजब किस्से आपल्याा ऐकू येत आहेत.
भारतासारख्या फुटबॉल चाहत्यांचा वनवा असलेल्या देशातही असे काही फुटबॉल वेडे आहेत की, त्यांच्या फुटबॉल प्रती असलेले प्रेम सर्वांना आवाक् करते.
2018 फिफा विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आपण भारतातील मोजक्या फुटबॉल चाहत्यांचे प्रेम पाहीले आहे. कोणी आपल्या घराला मेस्सीच्या प्रेमापोटी अर्जेंटीनाच्या जर्सीचा रंग देतोय तर कोणी आपल्या गावातील लोकांना फिफा विश्वचषक पाहता यावा म्हणून 15 लाखांचे कर्ज काढून ऑडीटोरीयम बांधतोय.
यात आता आणखी एका भारतीय फुटबॉल चाहत्याची भर पडली आहे. हा पट्या तर चक्क सायकल वरून प्रवास करत रशियाला आपला आवडता फु़टबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि त्याचा संघ अर्जेंटीनाला सपोर्ट करण्यासाठी गेलाय.
कोच्चीचा 28 वर्षीय क्लिफीन फ्रान्सीस हा मेस्सीचा चाहता सायकल वरून 4,000 कि.मी प्रवास करून रशियात पोहचला आहे.
त्याला आपला आवडता फुटबॉलपटू मेस्सीला भेटून सायकलवर मेस्सीची स्वाक्षरी देखील घ्यायची आहे.
“मला फुटबॉल लहानपणापासून आवडते. अर्जेंटीना माझा आवडता संघ आहे. फिफा विश्वचषक मैदानावर जाऊन पाहणे माझे स्वप्न होते. पण अर्थिक कारणांमुळे मला शक्य नसल्याने मी सायकलच्या माध्यमातून रशियाला यायचे ठरवले.” टाइम्स ऑफ इंडीया या वृत्तपत्राशी बोलताना क्लिफीन फ्रान्सीसने सांगितले.
क्लिफीन फ्रान्सीस शनिवार दि.16 जूनला मॉस्कोपासून 700 कि.मी दूर होता.
क्लिफीन फ्रान्सीस फ्रान्स आणि डेनमार्क यांच्यातील 26 जूनला होणारा गट सामना पाहणार आहे. काही कारणांमुळे त्याला मेस्सीच्या अर्जेंटीनाचा सामना पाहता येणार नाही. मेस्सीची भेट आणि सायकलवर स्वाक्षरी मिळावी ही त्यांची इच्छा आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1903526456346049&set=a.782194641812575.1073741825.100000661388986&type=3&theater
या सामन्यानंतर रशीयात काही दिवस राहून पुन्हा सायकलवरूनच क्लिफीन फ्रान्सीस कोच्चीला परतार आहे.
संबधित बातम्या-
–रशियातील फिफा विश्वचषकासाठी या भारतीयाने काढले तब्बल 15 लाखांचे कर्ज
–मेस्सीच्या कोलकात्यामधील चाहत्याने घरालाच दिला अर्जेंटीनाच्या जर्सीचा रंग