जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या, तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. आता यात आणखी एका मोठ्या स्पर्धेची भर पडली आहे. भारतात सन २०२१ मध्ये होणारा १७ वर्षांखालील फिफा महिला विश्वचषक रद्द करण्यात आला आहे. पण असे असले तरी भारताला २०२२ मध्ये हा विश्वचषक आयोजित करण्याची संधी देण्यात आली आहे.
खरंतर ही स्पर्धा नोव्हेंबर २०२० मध्येच होणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान भारतात आयोजित करण्याचा निर्णय फिफाने घेतला होता. मात्र आता २०२१ मध्ये होणारी ही स्पर्धाही रद्द केली असून आता २०२२ मध्ये हा विश्वचषक भारतात होईल.
फिफाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की ते सर्व भागधारकांशी, सहभागी सदस्य संघटनांशी याबाबत सल्लामसलत करत आहे. तसेच खेळाडूंच्या सुरेक्षेसाठी कोरोनाबाबत सुरक्षा आणि संभाव्य परिणामांवरही लक्ष ठेवून आहे.
भारतात २०२२ मध्ये १७ वर्षांखालील फिफा महिला विश्वचषक होणार असल्याने कोस्टा रिकामध्ये २०२२ ला २० वर्षांखालील फिफा महिला विश्वचषक होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी गरीब मुलांबरोबर लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद ;पाहा व्हिडिओ
फुटबॉल विश्वात खळबळ! सामना सुरु असतानाच विदाचा कोरोना अहवाल आला पाॅझिटिव्ह
धक्कादायक! ‘या’ जागतिक फूटबॉलपटूच्या मेंदूत गाठी, लवकरच करावी लागणार शस्त्रक्रीया