---Advertisement---

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी गरीब मुलांबरोबर लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद ;पाहा व्हिडिओ

---Advertisement---

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाने मुंबईमधील शिवाजी पार्क येथे शुक्रवारी (13 नोव्हेंबर) दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मनसैनिकांसह पक्षाध्यक्ष राज ठाकरे, त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे व सुपुत्र अमित ठाकरे उपस्थित होते.

अमित ठाकरे यांनी गरीब मुलांबरोबर घेतला फुटबॉल खेळाचा आनंद

शिवाजी पार्कवर ‘फूटबॉल फुटी’ नावाची एक क्रीडासंस्था गरीब मुलांना फुटबॉल या खेळाचे मोफत प्रशिक्षण देते. या संस्थेने अमित ठाकरे यांना फुटबॉल खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. अमित ठाकरे यांनी आमंत्रण स्वीकारले आणि या गरीब मुलांबरोबर फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला. यात आपल्याला अमित यांचे फुटबॉल या खेळाचे कौशल्यही पाहायला मिळाले.

https://www.instagram.com/p/CHiJ46dhwbZ/?igshid=1a4vgvbi8gauw

राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा टेनिस कोर्टवरील फोटो व्हायरल
राजकारणात आपल्या रोकठोक भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे यांचाही काही दिवसांआधी टेनिस कोर्टवरील फोटो व्हायरल झाला होता. सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत टेनिस खेळतानाचा तो फोटो होता.

राज ठाकरे यांच्या ‘त्या’ रुबाबदार फोटोचीही चर्चा
गुरुवारी (12 नोव्हेंबर) राज ठाकरे यांच्या एका फोटोची जोरदार चर्चा होऊ लागली. या फोटोत राज ठाकरे ‘स्पोर्टी लुक’ मध्ये खुर्चीवर बसून चहा पीत होते. त्यानी गॉगलही लावला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

-हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल… राज ठाकरेंचा टेनिस कोर्टातील रुबाबदार फोटो व्हायरल

-मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुलगा अमितमध्ये रंगला टेनिसचा सामना

फुटबॉल विश्वात खळबळ! सामना सुरु असतानाच विदाचा कोरोना अहवाल आला पाॅझिटिव्ह

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---