रशियात होत असलेल्या फिफा विश्वचषकात आपल्या संघाला प्रोहत्सान देण्यासाठी अर्जेंटीनाचे माजी फुटबॉलपटू दिओगो मॅराडोना प्रत्येक सामन्याला मैदानात हजेरी लावून संघासाठी चियर करत आहेत.
मात्र फुटबॉल विश्वात वादाग्रस्त व्यक्ती म्हणुन ओळखले जाणारे मॅराडोना यांच्या विश्वचषका दरम्यानच्या असभ्य वागणूकीमुळे फिफाने मराडोना यांना वागणूक सुधारण्याची ताकीद दिली आहे.
अर्जेंटीनाच्या नायजेरीया विरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात त्यांनी अश्लिल हातवारे केल्यामुळे फुटबॉल विश्वातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे.
नायजेरीया विरुद्धच्या सामन्यात ८६ व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या मार्कोस रोजोने गोल करत सामन्यात विजयी आघाडी घेतली होती.
यावेळी या सामन्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मॅराडोना यांनी त्यांच्या दोन्ही हातांची मधली बोटे दाखवत प्रेक्षकांकडे हातवारे केले होते.
यापूर्वीही अर्जेंटीनाच्या १६ जूनला आइसलँड विरुद्धच्या सामन्यावेळी सामना पाहताना मैदानावर धूम्रपान करण्याची बंदी असुनही त्यांनी धूम्रपान केले होते.
त्यामुळे दिओगो मॅराडोना यांच्या असभ्य कृत्यांची दखल घेत फिफाने त्यांना त्यांची वागणूक सुधारण्याची ताकीद दिली आहे.
दिओगो मॅराडोना यांना फुटबॉल विश्वातील सर्वकालिन महान खेळाडू मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटीना संघाने 1986 साली विश्वचषक जिंकला होता.
यावर्षीच्या विश्वचषकात गतउपविजेता अर्जेंटीना संघाची कामगिरी त्यांच्या नावाला साजेशी अशी झाली नाही. तसेच कर्णधार लिओनेल मेस्सीही पूर्ण स्पर्धेत अडखळत खेळताना दिसत आहे.
अर्जेंटीना संघाने शेवटच्या क्षणी बाद फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटीनाचा बाद फेरीचा सामना बलाढ्य फ्रान्सशी शनिवार, ३० जूनला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फिफा विश्वचषक: आजपासून सुरु होणार नव्या विजेत्याचा शोध
फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार…