---Advertisement---

रशियातील फिफा विश्वचषकाने बदलला इराणचा इतिहास

---Advertisement---

रशियातील फिफा विश्वचषकात बुधवार दि. 20 जून रोजी इराण वि. स्पेन सामना कझान शहरात खेळला गेला. मात्र इतिहास घडला इराणच्या तेहरान शहरात.

बुधवार दि. 20 जूनला फिफा विश्वचकाच्या ब गटाच्या सामन्याच्या प्रेक्षपणाचे तेहरानमधील आझादी स्टेडीअममध्ये आयोजन केले होते.

इराणमध्ये महिलांना पुरषांसोबत सार्वजनिक ठिकाणी खेळ पाहण्याची परवानगी नाही.

पण तब्बल 37 वर्षांनंतर महिलांवरील पुरषांबरोबर सार्वजनिक ठिकाणी खेळ पाहण्याची बंदी इराण सरकारने उठवली. यापूर्वी 5 ऑक्टोबर 1981 साली इराणमध्ये महिला व पुरूषांनी एकत्र खेळ पाहिला होता.

या घटनेची दखल घेत स्पेनचा सर्जीओ रॅमोसने ट्वीट करत आनंद व्यक्त केला.

“आजच्या रात्रीचे खऱ्या विजेत्या इराणच्या महिला आहेत.”  असे सर्जीओ रॅमोसने ट्वीट केले.

हा सामना पहाण्यासाठी आलेल्या इराणी महिलांनी सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला.

मात्र इराणला या सामन्यातच 1-0 असा पराभव पत्करावा लागला. इराणचा पुढचा सामना तगड्या पोर्तूगालशी सोमवार दि. 25 जूनला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

माजी भारतीय कबड्डीपटूचे स्वप्न उतरले सत्यात!

भारतीय कबड्डी संघाच्या नवीन जर्सीचे झाले अनावरण!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment