कतारमध्ये पुरूष फुटबॉल संघाचा 22वा फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) खेळला जात आहे. या स्पर्धेत सध्या बाद फेरीचे सामने सुरू असून अर्जेंटिना आणि नेदरलॅंड्स हे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. हा विश्वचषक सुरू होण्याआधी अनेक चर्चांना उधान आले होते. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे पहिल्यांदा विश्वचषक एका अरब देशात खेळला गेला आणि दुसरे कारण म्हणजे बाकी लीग सुरू असताना मध्येच स्पर्धा खेळली जात आहे. याचा अर्थ स्पर्धेची वेळही चुकली. हे सर्व सुरू असताना कतारमध्ये स्पर्धेची जोरदार तयारी सुरू होती. यासाठी सात नवे स्टेडियम उभारले गेले. ज्यामधील एक स्टेडियम स्पर्धा संपल्यानंतर उद्ध्वस्त केले जाणार आहे.
कतारची राजधानी दोहा येथील ‘स्टेडियम 974’ हे त्या नवीन स्टेडियमपैकी एक. जे या स्पर्धेनंतर उद्ध्वस्त केले जाणार आहे. आयोजकांच्या मते, या स्टेडियमची आसन क्षमता 40 हजारांच्या आसपास आहे. हे स्टेडियम टाकाऊ वस्तूपासून बनवले आहे. ज्यामध्ये स्टिल, शिपिंग कंटेनर्स यांचा वापर केलेला आहे.
आयोजकांनी सांगितले की स्टेडियम पूर्णपणे उद्ध्वस्त करणे शक्य आहे आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवणे देखील शक्य आहे ज्यांना त्यांची आवश्यकता आहे. देशाबाहेरील आणि देशांतर्गत अनेक तज्ञांनी या स्टेडियमच्या पायाभूत रचनांचे कौतुक केले आहे. तथापि, ते असेही म्हणाले की डिझाइनच्या यशाचे मूल्यांकन स्पर्धा संपल्यानंतरच केले जाऊ शकते. तसेच हे जगातील पहिले वाहतूक करण्यायोग्य फुटबॉल मैदान आहे. ते दुसऱ्या देशात नेले जाऊ शकते आणि लेगो (Lego) सारखे परत एकत्र केले जाऊ शकते.
In one of the most anticipated #Qatar2022 Stadium debuts, Stadium 974 is set to host #MEX v. #POL#FIFAWorldCup pic.twitter.com/Gl4HTZWCPl
— AFC U23 Asian Cup Qatar 2024™ (@Qatar2023en) November 22, 2022
या स्टेडियमसाठी जेवढे कंटेनर्स वापरले गेले त्यावरून त्याचे नाव स्टेडियम 974 पडले. त्याचबरोबर हा कतारचा कंट्री कोडही आहे. या स्पर्धेत जेवढे स्टेडियम आहेत त्यापैकी केवळ हाच एक स्टेडियम असा आहे, ज्यामध्ये कंडिशनिंगची सुविधा नाही. या स्टेडियमध्ये केवळ संध्याकाळीच सामने खेळवले जातात. व्हाईट एलेफंटमुळे ही कल्पना लढवली गेली आहे. (व्हाईट एलेफंट म्हणजे स्पर्धेनंतर ज्या स्टेडियमचा वापर होत नाही असे) FIFA World Cup 2022 Stadium 974 in Doha Will be Dismantle fully
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठ महिन्यांपूर्वी कोणाला माहित नसलेला कुलदीप सेन आज टीम इंडियासाठी खेळतोय
मेस्सीने रचला इतिहास! सामना संपण्यास 1 मिनिट असताना मार्टिनेझच्या भन्नाट सेव्हने अर्जेंटिना सुपर 8मध्ये