---Advertisement---

फिफा विश्वचषक २०१८- ओळख ई गटाची

---Advertisement---

-नचिकेत धारणकर (Twitter- @nachi_1793 )

विश्वचषकात पात्र होणारे संघ कोणते असं विचारलं तर पहिले नाव येते ब्राझील. आपल्या पात्रताफेरीतून ऊरूग्वे, अर्जेन्टिना सारख्या बलाढ्य संघाना हरवून पात्र झालेल्या ब्राझीलचे ई गटातून पहिल्या क्रमांकावर पुढील फेरीत जायची सर्वात जास्त शक्यता आहे. खरी स्पर्धा असेल ती दूसऱ्या स्थानासाठी स्वित्झर्लंड आणि कोस्टा-रिका मध्ये. २०१४च्या विश्वचषकात अनपेक्षित रित्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारे कोस्टा-रिका तर जागतिक क्रमवारीत ६व्या क्रमांकावर असलेल्या स्वित्झर्लंडया दोन्ही संघाना एका स्थानासाठी लढावे लागेल. तर विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सर्बिया कडून सुद्धा धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे.

गट ई

ब्राझील :- जागतिक क्रमवारी २
आजपर्यंत झालेल्या सर्व २० विश्वचषकात खेळणारा आणि २१ विश्वचषकास पात्र ठरलेला एकमेव संघ म्हणजे ब्राझील. तसेच सर्वात जास्त वेळा म्हणजेच तब्बल ५ वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरणाऱ्या ब्राझील संघांकडून नेहमीच सर्वाना अपेक्षा असते. मेस्सी, रोनाल्डोच्या दादागिरीला विराम कोण खेळाडू लावेल अशी चर्चा झाली तर पहिले नाव येते ते सुद्धा ब्राझीलच्या स्टायकार नेमार. जिसस, नेमार, कॉटिन्हो, फिरमिनो, कॅसेमीरो, विलियन, मार्सेलो, थिएगो सिल्वा, एडर्सन सारखे उत्कृष्ट खेळाडू संघात आहेत. डॅनी अल्वेस संघात नसल्याने त्याची कमी ब्राझीलला भासेल पण त्यांचा संघ पाहता ते या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार समजले जाताय.

सामन्यांचे वेळापत्रक :- ब्राझील विरुद्ध
१७ जून स्वित्झर्लंड
२२ जून कोस्टा-रिका
२७ जून सर्बिया
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- विजेते (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२)
विश्वचषकातील प्रदर्शन :- १०४ सामने ७० विजय १७ पराभव तर १७ सामने ड्रॉ.
ब्राझीलने विश्वचषकात एकूण २२१ गोल्स केले असून १०२ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- ४थे स्थान
दक्षिण आफ्रिका (२०१०) :- उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
जर्मनी (२००६) :- उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- विजेते.

मॅनेजर :- तिटे
प्रमुख खेळाडू :- नेमार
संभाव्य रचना :- ४-३-३

स्वित्झर्लंड :- जागतिक क्रमवारी ६
युरो २०१६ च्या स्पर्धेत फ्रान्स सारख्या संघाला बरोबरीत रोखण्यापासून ते क्रमवारीत ६व्या स्थानावर झेप घेण्यापर्यंत स्वित्झर्लंड संघ सर्वांना धक्का देतच इथे आला आहे. तुलनेने अवघड गट आल्याने त्यांना याच फेरीतून पुढे प्रवेश मिळवणे थोडे अवघड जाणार आहे पण शकिरी हा त्यांचा हुकमी एक्का आहे. त्याला मेस्सीच्या कौशल्याचा समजतात. तसेच गोलकिपर यान सोमर हा सुद्धा त्यांचा महत्वाचा खेळाडू आहे. त्यांच्या संघातील अनुभवी आणि तरुण खेळाडूंच्या मिश्रणाने त्यांचा संघ अजून मजबूत बनतो.

सामन्यांचे वेळापत्रक :- स्वित्झर्लंड विरुद्ध
१७ जून ब्राझील
२२ जून सर्बिया
२७ जून कोस्टा-रिका

विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश (१९३४, १९३८, १९५४)
विश्वचषकातील प्रदर्शन :- ३३ सामने ११ विजय १६ पराभव तर ०६ सामने ड्रॉ.
स्वित्झर्लंडने विश्वचषकात एकूण ४५ गोल्स केले असून ५९ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- अंतिम १६ संघात प्रवेश.
दक्षिण आफ्रिका (२०१०) :- उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
जर्मनी (२००६) :- साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात.
अमेरिका (१९९४) :- अंतिम १६ संघात प्रवेश.
मॅनेजर :- व्लादिमिर पेटकोव्हिक
प्रमुख खेळाडू :- झेर्दान शकिरी
संभाव्य रचना :- ४-२-३-१

कोस्टा-रिका :- जागतिक क्रमवारी २५
ऑस्कर रॅमीरेझने कोस्टा-रिका संघात अविश्वसनीय बदल घडवत संघाला प्रत्येक सामन्यानंतर नवीन उंचीवर घेऊन जात आहेत. २०१४ साली ऊरूग्वे, इटली, इंग्लंड सारख्या संघांना धक्का देत साखळी फेरीत आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले होते तर पुढील फेरीत ग्रीसला हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. तिथे सुद्धा नेदरलॅन्डला कडवी झुंज दिली होती. नावासचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा ते कोणत्या संघाला धक्का देतात का ते पाहण्यासारखे असेल.

सामन्यांचे वेळापत्रक :- कोस्टा-रिका विरुद्ध
१७ जून सर्बिया
२२ जून ब्राझील
२८ जून स्वित्झर्लंड
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश (२०१४)
विश्वचषकातील प्रदर्शन :- १५ सामने ५ विजय ६ पराभव तर ४ सामने ड्रॉ.
कोस्टा-रिकाने विश्वचषकात एकूण १७ गोल्स केले असून २३ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
जर्मनी (२००६) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
इटली (१९९०) :- अंतिम १६ संघात प्रवेश.

मॅनेजर :- ऑस्कर रॅमीरेझ
प्रमुख खेळाडू :- नावास
संभाव्य रचना :- ५-४-१

सर्बिया :- जागतिक क्रमवारी ३५
जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकामध्ये साखळी सामन्यातच बाहेर जावे लागल्याने या वर्षी सर्बियाला मोठ्या अपेक्षा आहेत. पात्रता फेरीत केवळ एकच सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागलेल्या या संघाला गटात ब्राझीलबरोबरच इतर २ संघांचे सुद्धा कडवे आव्हान असेल. नेमांजा मॅटिक हा त्यांचा प्रमुख खेळाडू आहे जो मध्यमफळीतून संघासाठी संधी निर्माण करायचे काम करेल.

सामन्यांचे वेळापत्रक :- सर्बिया विरुद्ध
१७ जून कोस्टा-रिका
२२ जून स्वित्झर्लंड
२७ जून ब्राझील
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- ४थे स्थान. (१९३०, १९६२)
विश्वचषकातील प्रदर्शन :- ४३ सामने १७ विजय १८ पराभव तर ८ सामने ड्रॉ.
सर्बियाने विश्वचषकात एकूण ६४ गोल्स केले असून ५९ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
दक्षिण आफ्रिका (२०१०) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
जर्मनी (२००६) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
फ्रान्स (१९९८) :- अंतिम १६ संघात प्रवेश.
इटली (१९९०) :- उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.

मॅनेजर :- मल्डेन क्रेस्टॅडिक
प्रमुख खेळाडू :- नेमांजा मॅटीक
संभाव्य रचना :- ३-४-३

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment