भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि कॅप्टन कूल नावाने ओळखल जाणारा महेंद्र सिंह धोनीचा (MS Dhoni) क्रेझ जराही कमी आहे. अनेक चाहते त्याची झलक पहायला उत्सुक आसतात. धोनीने शेवटचा सामना 2019मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने आतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घोषित केली. दरम्यान महेंद्र सिंह धोनी क्रिकेटमधून बाजूला होवून हॉकी स्टेडियमवर(Hockey Stadium) भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास वाढवायला पोहोचला. हॉकी स्टेडिमधील धोनीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
भारतीय हॉकीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी रांचीत मोरहाबाद येथील मरांग गोमके जयपाल सिंह मुंडा एस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम येथे ओलंपिक उपांत फेरीचा सामना पहायला गेला होता. हा सामना भारतीय महिला संघ आणि जर्मनी यांच्यात चालू होता. धोनीचा या स्टेडियमवर पोहोचल्यावर चाहत्यांमध्ये एक वेगळाचं उत्साह बघायला मिळाला. भारतीय हॉकीने जो व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडिओत धोनीने एक खास पद्धताचे जॅकेट घातले आहे. तसेच कॅप्टन कूलने एका चेंडूवर त्याचा ऑटोग्राफ देखील दिला आहे. धोनीसोबत भारतीय हॉकीचे महासचिव भोला सिंह उपस्थित होते. धोनीचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूपचं आवडला आहे.
View this post on Instagram
महेंद्र सिंह धोनी नुकेतेच ऋषभ पंतच्या बहिनीच्या लग्नात हजेरी लावली होती. त्या वेळेस पण अनेक फोटो वायरल झाले होते. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर तो फक्त आईपीएल खेळताना दिसतो. धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने सर्वाधिक पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आगामी आयपीएल हंगामात देखील 42 वर्षीय दिग्गज सीएसकेचे नेतृत्व करताना दिसू शकतो. धोनी आगामी आयपीएल हंगामानंतर कारकिर्दीचा शेवट करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (FIH. Dhoni’s appearance in the field to watch the semi-final, you will also appreciate the captain cool look)
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ, मिकी आर्थरसह दोन सपोर्ट स्टाफचा तडकाफडकी राजीनामा